नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महापालिका, पोलीस आणि महावितरणचे अधिकारी रस्त्यावर

 

कसबा मतदारसंघात प्रशासनाचा व्यापक पाहणी दौरा

पुणे : नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना वारंवार सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात, ही नेहमीची तक्रार. मात्र, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचल्यास अनेक समस्या तत्काळ सुटू शकतात, याचे उत्तम उदाहरण कसबा मतदारसंघात पाहायला मिळाले. आमदार हेमंत रासने यांच्या माध्यमातून नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी एक व्यापक पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी सहभागी झाले होते.

रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि विद्युतपुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. यावेळी पथविभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, मलनिसारण मुख्य अभियंता संतोष तांदळे, अतिक्रमण विभागाचे संदीप खलाटे, परिमंडळ ५ चे उपायुक्त सुनिल बल्लाळ, आकाश चिन्ह उपायुक्त श्री. ठोंबरे, भवानी पेठ क्षेत्रीय सहआयुक्त किसन दगडखेर, विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे सुहास जाधव, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता तरंग, भाजप कसबा मंडलाध्यक्ष अमित कंक, छगन बुलाखे, प्रशांत सुर्वे यांच्यासह कसबा मतदारसंघातील माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, "नागरिकांच्या तक्रारी केवळ कागदावर न राहता, प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्यावर उपाययोजना करणे, ही आमची प्राथमिकता आहे. अशा संयुक्त दौऱ्यामुळे समस्या समजून घेणे आणि तातडीने निर्णय घेणे शक्य होते. भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवले जातील. नालेसफाई तसेच ड्रेनेजसंबंधी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली जातील."

आमदार हेमंत रासने म्हणाले, "गेली पाच महिन्यांपासून मतदारसंघात अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा नियमितपणे करण्यात येत आहे. नागरिकांचे प्रश्न ऐकून घेणे आणि जागेवरच उपाययोजना करणे, हा या दौऱ्याचा उद्देश आहे. प्रशासनाच्या सक्रिय सहभागामुळे बहुतांश समस्या तत्काळ निकाली काढण्यात आल्या असून, उर्वरित समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यात येईल."


'स्वच्छ सुंदर आणि विकसित कसबा' अभियानांतर्गत कसब्यातील बहुतांश क्रॉनिक स्पॉट बंद करण्यात आले असून, या ठिकाणी सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी प्रस्तावित दोन भुयारी मार्गांचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. रस्त्यावरील अनधिकृत फ्लेक्स, अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाने व्यापक मोहीम राबवण्याची सूचना यावेळी रासने यांनी केली आहे.

.........................................................

#KasbaPune

#PuneCorporation

#PublicService

#HemantRasane

#CivicIssues

#PunePolice

#Mahavitaran

नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महापालिका, पोलीस आणि महावितरणचे अधिकारी रस्त्यावर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महापालिका, पोलीस आणि महावितरणचे अधिकारी रस्त्यावर Reviewed by ANN news network on ५/०८/२०२५ १०:२४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".