नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
पुणे : हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी आज दिनांक १३ मे २०२५ रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार तासांमध्ये जिल्ह्यातील विविध भागांत ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ही माहिती शासकीय सचेत अॅपवरून प्रसारित करण्यात आली असून नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अशा परिस्थितीत नागरिकांनी घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगावी, उघड्या मैदानात, झाडांखाली किंवा वीज वाहक खांबांजवळ थांबू नये. वाहन चालवताना अतिरिक्त काळजी घ्यावी आणि शक्यतो या काळात प्रवास टाळावा, अशी सूचना हवामान विभागाने केली आहे.
पुणे जिल्ह्यातील हडपसर, कोंढवा, येरवडा, वाकड, हिंजवडी, लोणावळा, तळेगाव आणि आजूबाजूच्या परिसरात विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन प्रतिसाद पथके सज्ज ठेवली आहेत.
सचेत अॅपवर उपलब्ध केलेल्या माहितीनुसार, या पावसामुळे वाहतूक कोंडी, पाणी साचणे, वृक्ष कोसळणे यांसारखे धोके संभवू शकतात.
=========================
#PuneRains
#OrangeAlert
#WeatherWarning
#Thunderstorm
#MaharashtraWeather

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: