अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्यासमवेत 'गृहशिल्प कन्स्ट्रक्शन 'चे अमोल चौधरी आणि शेफाली चौधरी
सोनाली कुलकर्णी सांगते आहे घरांच्या पुनर्बांधणीचे फायदे !
पुणे : सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (सिनियर) नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आल्या असून, त्यांनी 'गृहशिल्प कन्स्ट्रक्शन 'या पुण्यातील घरांच्या पुनर्बांधणी क्षेत्रातील नावाजलेल्या संस्थेसाठी जाहिरात शृंखलेचा चेहरा म्हणून काम केलं आहे. घरांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत, त्या नव्या जीवनशैलीत कशा रुजतात हे त्यांनी भावनिक आणि आशयघन शैलीत मांडलं आहे.या नवीन जाहिरात शृंखलेचे लेखन आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांनी केले असून, 'रीडिफाइन प्रॉडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत अमोल चौधरी आणि शेफाली चौधरी यांच्या 'गृहशिल्प कन्स्ट्रक्शन ' साठी ही मालिका साकारण्यात आली आहे.
पुण्यातील वाढत्या पुनर्बांधणी प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर ही शृंखला केवळ जाहिरात नसून, ती एक भावनिक संवाद घडवते. पैशासोबतच आठवणी आणि नातीही या घरांमध्ये गुंतलेली असतात, हे अधोरेखित करणाऱ्या या पाच भागांच्या मालिकेचा पहिला भाग अक्षयतृतीया निमित्ताने सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे.सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी भावनिक ओलावा आणि वास्तवतेची जाण असलेली ही कथा मालिका सोनाली कुलकर्णी यांच्या अभिनयाने अधिक परिणामकारक ठरली आहे.प्रेक्षकांमध्ये आधीच उत्सुकता निर्माण करणाऱ्या या जाहिरात मालिकेतील पहिली फिल्म विशेष लक्ष वेधून घेत आहे.यापुढील भागही लवकरच समाजमाध्यमांवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
----------
#SonaliKulkarni
#GruhshilpConstruction
#PuneRedevelopment
#MarathiAds
#EmotionalCampaign
#AkshayaTritiya2025
#YogeshDeshpande
#RedefineProduction
#HomeRebuilding
#RealEstateWithHeart
#MarathiCinemaStar

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: