'अनुवेध'मधून कथक नृत्याचे विलोभनीय दर्शन !

 


पुणे : आंतरराष्ट्रीय नृत्यदिनानिमित्त 'मनीषा नृत्यालय'च्या वतीने  आयोजित 'अनुवेध' या कथक नृत्य सादरीकरणाला मंगळवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला ज्येष्ठ नृत्यगुरू पं. मनीषा साठे यांच्या शिष्यांनी आपापल्या विद्यार्थिनींसमवेत विलोभनीय नृत्य सादर केले तसेच मनीषा साठे यांनीही नृत्यरचना सादर करून आंतरराष्ट्रीय नृत्यदिनाचा आनंद द्विगुणित केला! एकूण १४३ नृत्यांगनांनी या सादरीकरणात सहभाग घेतला.

 हा कार्यक्रम दि.२९ एप्रिल २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड) येथे सायंकाळी ६ वाजता झाला.पं.मंजिरी देव,श्रीराम देव(मुंबई),रेखा नाडगौडा(नाशिक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.शिल्पा दातार,मंजिरी कारुळकर,पद्मश्री जोशी,पूर्वा शाह,मानसी गदो,तेजस्विनी साठे,माधुरी आपटे,गौरी स्वकुळ,ईशा काथवटे,अदिती कुलकर्णी,पायल गोखले,वल्लरी आपटे,मिथिला भिडे,मधुरा आफळे यांनी तसेच शांभवी दांडेकर यांच्या विद्यार्थिनींनी  कार्यक्रमात नृत्य सादर केले.

ज्येष्ठ नृत्यगुरू मनीषा साठे यांनी शिवस्तुती वर आधारित नृत्यरचना  सादर केली आणि त्रिताल सादर केला. त्यांच्या शिष्यांनी झपताल,चतरंग,बंदिश,तराणा,होरी,बरखा,झुला आदि सादरीकरणे प्रभावीपणे सादर केली आणि उपस्थितांची वाहवा मिळवली.संपूर्ण नाट्यगृह नृत्यरसिकांनी भरले होते.सूत्रसंचालन मुग्धा पाठक  यांनी केले.गौरी स्वकुळ यांनी आभार मानले.

नृत्यातून प्रकटावेत नवोन्मेष ! :मनीषा साठे

आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त आयोजित 'अनुवेध' या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नृत्य गुरु पं.मनीषा साठे म्हणाल्या,'नृत्यातून नवोन्मेष प्रकटावेत आणि त्यासाठी परिश्रम घ्यावेत.देशाला आणि पुण्याला नृत्याची उज्ज्वल परंपरा आहे,ही परंपरा पुढे नेण्यासाठी योगदान द्यावे'.मंजिरी देव म्हणाल्या,'मनीषा साठे यांनी खूप लहानपणापासून नृत्य साधनेला सुरुवात केली.नृत्याचा मनात रुंजी घालणारा नाद असतो,हा नाद त्यांनी जपला आहे.या वयातदेखील त्या अप्रतिम नृत्य करतात,हे कौतुकास्पद आहे.त्यांनी शतायुषी होऊन पुढील पिढीला मार्गदर्शन केले पाहिजे'

रेखा नाडगौडा यांच्या सनमान नृत्य संस्थेचे सुवर्ण महोत्सव वर्ष सुरू आल्यामुळे केला. त्या म्हणाल्या की,'अनुवेध  म्हणजे जाणीवपूर्वक,मन:पूर्वक केलेला प्रयत्न.

आणि तो प्रयत्न मनीषा साठे  करत आहेत. ही जाणीव पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत आहे.मनीषा ताई, त्यांच्या विद्यार्थिनी आणि त्यांच्या विद्यार्थिनींच्या विद्यार्थिनी असा तीन पिढ्यांचा संगम पाहायला मिळाला,हीच संस्मरणीय गोष्ट आहे.मंजिरी देव यांच्या  वयाच्या  पंचाहत्तरीनिमीत्त सन्मान करण्यात आला.पं.गोपीकृष्ण यांच्याकडे वेगवेगळ्या काळात त्यांनी शिक्षण घेतलेल्या रेखा नाडगौडा,मंजिरी देव आणि मनीषा साठे यांची नृत्य दिनी एकत्रित उपस्थिती हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.

..........................................

#Anuvedh2025 

#KathakDance 

#ManishaSathe 

#InternationalDanceDay 

#IndianClassicalDance 

#NrityaFestival 

#YashwantraoChavanNatyagruha 

#PuneEvents 

#DanceHeritage 

#IndianDanceLegacy 

#KathakPerformance



'अनुवेध'मधून कथक नृत्याचे विलोभनीय दर्शन ! 'अनुवेध'मधून कथक नृत्याचे विलोभनीय दर्शन !   Reviewed by ANN news network on ५/०१/२०२५ ०५:५५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".