प्राधिकरण, निगडी - रमाकांत श्रीखंडे यांच्या 'स्वांत: सुखाय' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन १२ मे २०२५ रोजी कॅप्टन कदम हॉल, सावरकर सदन येथे महाराष्ट्र साहित्य परिषद (म.सा.प.) पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या शुभ हस्ते झाले.
गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्राचार्य मुकुंद दातार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात लाखे यांनी निवडक कवितांचे मार्मिक रसग्रहण केले. डॉ. दातार यांनी आपल्या ओघवत्या शैलीत काव्याचे महत्त्व सांगितले. रसिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त दाद दिली.
या कार्यक्रमाला श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सौ. विनिता श्रीखंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
-----------------------------------------
#MarathiLiterature
#MarathiPoetry
#BookLaunch
#Kavita
#Sahitya
#PimpriChinchwad
Reviewed by ANN news network
on
५/१४/२०२५ ०१:०७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: