लाईटहाऊस प्रकल्पाद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण

 


आयुक्त शेखर सिंह यांची निगडी लाईटहाऊस केंद्राला भेट; युवकांशी संवाद

पिंपरी (प्रतिनिधी) - लाईटहाऊस प्रकल्प हे केवळ प्रशिक्षण केंद्र नसून, युवकांच्या स्वप्नांना दिशा देणारे परिवर्तनाचे व्यासपीठ आहे. येथील प्रशिक्षणामुळे तरुणांच्या सुप्त गुणांना चालना मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या भविष्यासाठी सशक्त पाया उभारण्यात मदत होते, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह आणि समाज विकास विभागाचे सहायक आयुक्त तानाजी नरळे यांनी आज निगडी येथील कौशल्यम - लाईटहाऊस कौशल्य विकास केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रशिक्षण पूर्ण करून यशस्वीरित्या नोकरी मिळविलेल्या युवक-युवतींशी संवाद साधला.

यावेळी युवकांनी कौशल्य प्रशिक्षणानंतर समाजात आणि उद्योगक्षेत्रात निर्माण केलेली ओळख, आर्थिक स्वावलंबनाकडे केलेली वाटचाल आणि आत्मविश्वासाने अडचणींवर केलेली मात याबद्दल सांगितले. आयुक्त सिंह यांनी लाईटहाऊस टीमसोबत केंद्राच्या कार्यपद्धती, यशस्वी प्रकल्पांची माहिती, प्रशिक्षण मॉड्यूल्स आणि आगामी योजनांची सविस्तर माहिती घेतली.

आयुक्त सिंह म्हणाले, "२०२५-२६ या वर्षात लाईटहाऊस टीमने स्थानिक पातळीवर अधिकाधिक युवकांपर्यंत पोहोचावे. प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांच्या आकांक्षा, उद्योगजगतातील गरजा आणि सामाजिक बदलांची गरज यांचा समन्वय साधून योग्य कौशल्ये व रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात. तसेच, प्रशिक्षण घेतलेल्या युवकांनी इतर तरुणांनाही या प्रवासात सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे."

या भेटीदरम्यान, आयुक्त सिंह यांनी केंद्रातील प्रशिक्षण सुविधांची पाहणी करून प्रशिक्षक व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि युवकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

लाईटहाऊसमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर आत्मविश्वास वाढल्याचे मत प्रशिक्षणार्थी पायल कांबळे या युवतीने व्यक्त केले.

कौशल्यम-लाईटहाऊस प्रकल्प पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चालवला जातो. १८ ते ३५ वयोगटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आणि सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना मोफत कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

-----------------------------------------------------

#PCMCLightHouse

#SkillDevelopment

#YouthEmpowerment

#Employment

#PimpriChinchwad

#Maharashtra

लाईटहाऊस प्रकल्पाद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण लाईटहाऊस प्रकल्पाद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण Reviewed by ANN news network on ५/१४/२०२५ ०१:०३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".