नव्वदीतील गुरुजी, सत्तरीतील शिष्य 'तारांगणा'साठी एकत्र!

 


पुणे: न्यू इंग्लिश स्कूल (टिळक रस्ता) येथील नव्वदीतील शिक्षकांनी आणि 1970 च्या दशकातील सत्तरी पार केलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेतील 'तारांगणा'साठी वातानुकूलन यंत्रणा भेट दिली आहे.

'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियाना'त न्यू इंग्लिश स्कूलने महापालिका व खासगी शाळा गटात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावून 21 लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले. या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि शाळेचे कौतुक करण्यासाठी माजी विद्यार्थी आणि त्यावेळच्या शिक्षकांनी एकत्र येत 4 लाख 65 हजार रुपयांचा निधी जमा केला आणि त्यातून 'तारांगणा'साठी वातानुकूलन यंत्रणा शाळेला दिली.

या उपक्रमात इंग्रजीचे शिक्षक मो. रा. फाटक, हिंदीच्या ललिता गुप्ते व पेठकर मॅडम, गणिताचे ठाकूर देसाई आणि चित्रकलेचे वारे सर या नव्वदीतील शिक्षकांसोबत देश-विदेशात असलेले सुमारे 50 माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. किरण शाळिग्राम आणि दिलीप परदेशी या माजी विद्यार्थ्यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.

लोकमान्य टिळकांनी 1880 मध्ये राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने या शाळेची स्थापना केली. 1954 मध्ये सुरू झालेले 'तारांगण' हे शाळेचे खास आकर्षण आहे. येथे एका वेळी शंभर व्यक्ती बसू शकतात आणि कृत्रिम आकाश तयार करून ग्रह, तारे आणि तारकासमूहांबद्दल माहिती दिली जाते. शहर आणि परिसरातील अनेक शाळांमधील विद्यार्थी शैक्षणिक भेटीसाठी येथे येत असतात.

गोल घुमटाच्या आकारात असलेल्या या तारांगणात पंख्यांच्या आवाजामुळे स्पष्ट बोलणे ऐकण्यास अडथळा येत होता. ही समस्या दूर करण्यासाठी आता येथे वातानुकूलन यंत्रणा बसविण्यात आली आहे.

आज या यंत्रणेची औपचारिकरीत्या शाळेकडे सुपूर्द करण्यात आले. या कार्यक्रमाला डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह डॉ. आनंद काटिकर, मुख्याध्यापिका सुनीता राव, तारांगण प्रकल्पाचे प्रमुख विनायक रामदासी, अमित कुलकर्णी, विकास पढेर, आशा कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

--------------------------------

#NewEnglishSchool

#Pune

#Tarangan

#AlumniMeet

#Teachers

#SchoolDonation

#Education

#Maharashtra

#OldStudents

#Gratitude

नव्वदीतील गुरुजी, सत्तरीतील शिष्य 'तारांगणा'साठी एकत्र! नव्वदीतील गुरुजी, सत्तरीतील शिष्य 'तारांगणा'साठी एकत्र! Reviewed by ANN news network on ५/१२/२०२५ ०९:०९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".