अंमली पदार्थविरोधी कक्षाच्या आझादमैदान युनिटने दिनांक ५ मे २०२५ रोजी साकीविहार रोड, पवई परिसरात गस्तीदरम्यान एका इसमाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १०८ ग्रॅम वजनाचा एमडी (मेफेड्रॉन) जप्त करण्यात आला, ज्याची अंदाजित किंमत २१.६० लाख रुपये आहे. याप्रकरणी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा पुढील तपास आझादमैदान युनिट करत आहे.
त्याचबरोबर अंमली पदार्थविरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटने त्याच दिवशी लोखंडवाला बॅक रोड, ओशिवरा परिसरात गस्ती दरम्यान एका व्यक्तीला ताब्यात घेतले. या आरोपीकडून २.०४० किलो उच्च प्रतीचा हायड्रोपोनिक वीड जप्त करण्यात आला, ज्याची अंदाजित किंमत २.०४ कोटी रुपये आहे. याप्रकरणीही एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा पुढील तपास घाटकोपर युनिट करत आहे.
वरळी युनिटनेही त्याच दिवशी दादर कॅटरिंग कॉलेज जवळ, दादर (प.) परिसरात गस्तीदरम्यान एका व्यक्तीला ताब्यात घेतले. या आरोपीकडून ३.५५० किलो उच्च प्रतीचा हायड्रोपोनिक वीड जप्त करण्यात आला, ज्याची अंदाजित किंमत ३.५५ कोटी रुपये आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा पुढील तपास वरळी युनिट करत आहे.
तपासादरम्यान असे निष्पन्न झाले आहे की, अटक आरोपी हे लोखंडवाला आणि दादर परिसरात हायड्रोपोनिक वीड या अंमली पदार्थाची तस्करी करत होते. पोलिसांच्या निरीक्षणानुसार हायड्रोपोनिक वीडच्या सेवनाचे प्रमाण उच्च शिक्षित तरुण पिढीमध्ये वाढत असल्याचे दिसून येत आहे, जी चिंताजनक बाब आहे.
अशाप्रकारे अंमली पदार्थविरोधी कक्षाने विशेष मोहिमेंतर्गत एकूण १०८ ग्रॅम वजनाचा एमडी आणि ५.५९ किलो वजनाचा उच्च प्रतीचा हायड्रोपोनिक वीड असा एकूण ५.८० कोटी रुपयांहून अधिक किमतीचा अंमली पदार्थ जप्त करून तीन ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे.
ही यशस्वी कामगिरी श्री. देवेन भारती, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, श्री. लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), श्री. शशि कुमार मीना, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. शाम घुगे, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थविरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई, आणि श्री. सुधीर हिरडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थविरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाई अंमली पदार्थविरोधी कक्ष, गुन्हे शाखा, आझादमैदान युनिटचे प्रभारी पो.नि. श्री. राजेंद्र दहिफळे, घाटकोपर युनिटचे प्रभारी पो.नि. श्री. अनिल ढोले, वरळी युनिटचे प्रभारी पो.नि. श्री. संतोष साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
बृहन्मुंबई पोलीस अंमली पदार्थमुक्त समाज निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या कारवाईतून दिसून येत आहे.
---------------------------------------
#MumbaiPolice
#DrugBust
#AntiNarcoticsCell
#DrugSeizure
#HydroponicCannabis
#MDSeizure
#CrimeBranch
#PowaiOperation
#OshiwaraRaid
#DadarPolice
#NarcoticsControl
#DrugTrafficking
#MumbaiFightsDrugs
#PoliceAction
#CrimeControl

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: