‘निमा आयुर्वेद फोरम’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान
यापूर्वी वैद्य निलेश लोंढे यांनी महाराष्ट्र आयुर्वेद प्रचार प्रसार समितीचे अध्यक्ष म्हणून दोन वर्षे यशस्वी कार्य केले आहे. त्यांनी या काळात आयुर्वेद डॉक्टरांच्या अनेक समस्यांसाठी आवाज उठवला होता. केंद्र सरकारमधील आयुष मंत्री, सचिव आणि इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी वेळोवेळी चर्चा करून त्यांनी आयुर्वेद डॉक्टरांच्या अडचणी मांडल्या.
वैद्य लोंढे यांनी आयुर्वेदाला विमा संरक्षण मिळावे, केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांमध्ये (CGHS, ECHS) आयुर्वेद उपचारांचा समावेश व्हावा यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. यासोबतच, आयुर्वेद वैद्यांच्या दवाखान्यांचे आणि रुग्णालयांचे रजिस्ट्रेशन, डे केअर इन्शुरन्स सुविधा, तसेच ‘आयुर्वेद’ आणि ‘पंचकर्म’ हे शब्द केवळ नोंदणीकृत डॉक्टरांनीच वापरावेत यासाठी कायदा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. क्रीडा आणि औद्योगिक आरोग्य सेवेतही आयुर्वेदाचा समावेश व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत.
नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष वैद्य निलेश लोंढे यांना निमा सेंट्रल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. आशुतोष कुलकर्णी आणि इतर सदस्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यांच्या या निवडीमुळे देशभरातील आयुर्वेद डॉक्टरांना एक सक्षम नेतृत्व मिळाले आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
-----------------------------------------
#PimpriChinchwad
#NileshLondhe
#NIMA
#Ayurveda
#NationalPresident
#IndianMedicine
#Healthcare
#Ayush
#ProudMoment
Reviewed by ANN news network
on
५/१२/२०२५ ०९:०१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: