या कार्यक्रमात बोलताना प्रभुणे म्हणाले की, "शिक्षणामुळे मनुष्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची शक्ती मिळते, तसेच रोजगारक्षम शिक्षणामुळे त्याच्या प्रगतीचा मार्ग सुकर होतो. त्यामुळे रोजगारक्षम पिढी घडवणारे शिक्षण ही काळाची गरज आहे."
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिकारी डॉ. अरुण सांगोलकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हटले की, "यशस्वी संस्थेमुळे कौशल्य प्रशिक्षण युक्त युवा पिढी निर्माण होत आहे ही खूप कौतुकास्पद बाब आहे, कारण देशाच्या सर्वांगीण विकासासाठी युवा पिढी कुशल असणे आवश्यक आहे."
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगावच्या शिक्षण विस्तार अधिकारी मालती रासकर यांनी त्यांच्या मनोगतात म्हटले की, "गिरीश प्रभुणे काकांसारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वामुळे गुरुकुलमध्ये देशाची आधारस्तंभ बनू शकणारी पिढी तयार होत आहे; तर यशस्वी संस्थेमुळे देशाला प्रगतीपथावर नेणारी पिढी तयार होत आहे."
कार्यक्रमात यशस्वी संस्थेच्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख प्रशांत कुलकर्णी यांनी संस्थेच्या उपक्रमांविषयी संक्षिप्त माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या मुख्याध्यापिका पूनम गुजर यांनी केले, तर सूत्रसंचालन मारुती वाघमारे यांनी केले.
कार्यक्रमाच्या वेळी शैक्षणिक आणि अन्य उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुरुकुलमच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला यशस्वी संस्थेचे मार्केटिंग अधिकारी प्रशांत कुलकर्णी, यशस्वी संस्थेचे ग्रंथपाल पवन शर्मा, यशस्वी संस्थेच्या ऑपरेशन विभागाचे अधिकारी दिलीप पवार, इम्रान वानकर, उमेश गुरव, भरत ईप्पर, ज्ञानेश्वर गोफण व योगेश रांगणेकर यांच्यासह शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
...........................................
#PadmashriGirishPrabhune
#YashaswiSanstha
#SkillDevelopment
#MaharashtraDay
#EmploymentSkills
#EducationMatters
#YouthEmpowerment
#VocationalTraining
#PunaruthanGurukulam
#SkilledIndia

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: