पिंपरी : केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मिठाई वाटप करून आभार व्यक्त केले. आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली मोहन नगर टेल्को रोड येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
समारंभात बोलताना, आमदार अमित गोरखे यांनी काँग्रेसवर टीका करत म्हणाले, "काँग्रेसने त्यांच्या दीर्घ सत्ताकाळात जातिनिहाय जनगणना केली नाही आणि राहुल गांधी केवळ स्वतःची पाठ थोपटून घेत राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलित, आदिवासी आणि भटक्या जमातींना न्याय मिळवून देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे."
कार्यक्रमाला अनेक स्थानिक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये नगरसेवक केशव घोलवे, भाजपा पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष गणेश लंगोटे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष कैलास कुटे, शक्ती केंद्र प्रमुख मनीषा शिंदे यांच्यासह अनेक बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे संयोजन पिंपरी चिंचवड भाजपाचे उपाध्यक्ष गणेश लंगोटे यांनी केले होते. सर्व उपस्थितांनी या निर्णयामुळे समाजातील वंचित घटकांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.
........................................
#CasteCensus
#ModiGovernment
#BJP #PimpriChinchwad
#AmitGorkhe
#SocialJustice
#DalitRights
#TribalWelfare
#MarginalisedCommunities
#Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: