जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेद्वारे विविध सामाजिक उपक्रम
उरण: पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या संकल्पनेतून जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेद्वारे नढाळ वाडी, चौक तालुका खालापूर येथे स्थापन झालेल्या पंचायतन मंदिराचा तिसरा वर्धापन दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला.
या सोहळ्यात हरिपाठ, श्रींची पालखी मिरवणूक, दिंडी सोहळा आणि संगीत भजन यांसारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार अण्णासाहेब बनसोडे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेद्वारे या मंदिराच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. या ठिकाणी पायी दिंडीत येणाऱ्या भक्तांसाठी निवास, भोजन आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी सभागृहाची मोफत सोय आहे. तसेच, संस्थेद्वारे हिमांशू दिलीप पाटील इंग्लिश मीडियम स्कूल चालवण्यात येत असून, येथे गरजूंना मोफत शिक्षण आणि इतर आवश्यक सुविधा पुरवल्या जातात, अशी माहिती संस्थेचे माजी अध्यक्ष प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी दिली.
-----------------------------------------------
#PanchayatanTemple
#ReligiousCelebration
#Charity
#SocialService
#Maharashtra
Reviewed by ANN news network
on
५/१४/२०२५ ०९:१४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: