उरण: जेएनपीटीमध्ये गेल्या २५-३० वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या भूमिपुत्र कामगारांना योग्य वेतन आणि सुविधा मिळत नसल्याच्या मुद्द्यावर कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी प्रशासनासोबत चर्चा केली.
या कंत्राटी कामगारांनी घरत यांच्याकडे आपली व्यथा मांडल्यानंतर, त्यांनी कामगारांचे नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी (ता. १३) घरत यांनी जेएनपीटी प्रशासनासोबत बैठक घेतली आणि महाप्रबंधक मनीषा जाधव यांना कामगारांच्या मागण्यांचे निवेदन दिले.
या बैठकीत जाधव यांनी कामगारांना वेळेवर पगार देण्याचे आणि इतर मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
यावेळी न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------------------------
#JNPT
#ContractWorkers
#LaborRights
#WorkersRights
#Maharashtra
Reviewed by ANN news network
on
५/१४/२०२५ ०९:१०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: