पुणे, दि. २८: दिघी परिसरात तलवारीने केक कापून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून दहशत निर्माण करणाऱ्या पाच जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एका आरोपीकडे लोखंडी तलवारही सापडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मे २०२५ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता काळे कॉलनी, आळंदी देवाची येथे बंद पडलेल्या इमारतीजवळ पाण्याच्या टाकीजवळ आरोपी राकेश विजय सोळंकी (वय २१), अभिषेक बाजीराव नागरगोजे (वय २०), विश्वजित निळकंठ अंभोरे (वय १९), ऋषिकेश हरिश्चंद्र दुनघव (वय १९) आणि त्यांचे तीन अनोळखी साथीदार यांनी तलवारीने केक कापून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याव्यतिरिक्त, आरोपी क्रमांक १ राकेश सोळंकी याच्या ताब्यात एक लोखंडी तलवार सापडली. आरोपींनी पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रदीप गोरखनाथ गोंडाबे यांच्या फिर्यादीवरून दिघी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार डामसे पुढील तपास करत आहेत. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
-----------------------------------------------------------------------------------------------------
#DighiCrime #IllegalWeapons #SocialMediaCrime #PunePolice #WeaponBanViolation
Reviewed by ANN news network
on
५/२८/२०२५ ०५:१३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: