पुणे, दि. २८: दिघी पोलिसांनी डुडुळगाव येथे कारवाई करत ८७७ ग्रॅम गांजा जप्त केला असून, याप्रकरणी गणेश नागेश लोढे (वय २३) याला अटक केली आहे. त्याच्याकडून ३५० रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मे २०२५ रोजी रात्री ९.४० वाजता डुडुळगाव येथील अडबंगनाथ चौकात सावतामाळी मंदिरामागे रोडच्या कडेला आरोपी गणेश लोढे हा गांजा विक्रीसाठी उभा असल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल सुधीर डोळस यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
तपासणीत त्याच्या कब्जातून ४३ हजार ८५० रुपये किंमतीचा ८७७ ग्रॅम गांजा आणि ३५० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. आरोपी गणेश लोढे याच्याविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क) आणि २० (ब) (ii) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक वरे पुढील तपास करत आहेत.
-----------------------------------------------------------------------------
#DighiCrime #DrugTrafficking #MarijuanaSeizure #PunePolice #Arrested
Reviewed by ANN news network
on
५/२८/२०२५ ०५:१७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: