महाळुंगे एमआयडीसीमध्ये कंपनीतून तांब्याच्या वायरची चोरी; आरोपी अटक

पुणे, दि. २८: महाळुंगे एमआयडीसीमधील अॅप्टिव्ह कंपनीतून १६ नग तांब्याच्या वायरची चोरी करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. नटवर दीपक आकसे असे या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅप्टिव्ह कंपनीत काम करणारे अजय धरमसिंग चव्हाण यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, आरोपी नटवर आकसे हा कंपनीच्या मेंटेनन्स विभागात काम करत होता. त्याने कंपनीतील १५ हजार २०० रुपये किंमतीच्या १६ नग टी-५ एचईव्ही तांब्याच्या वायर चोरल्या आणि त्या मेस्ट्रो गाडी क्रमांक एमएच-१४-ईबी-४००९ च्या डिक्कीतून घेऊन जात असताना त्याला पकडण्यात आले.

आरोपी नटवर आकसे याला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरी केलेली वायर आणि गाडी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाये पुढील तपास करत आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------------

#MahalungeCrime #Theft #CopperWireTheft #PuneCrime #Arrested

महाळुंगे एमआयडीसीमध्ये कंपनीतून तांब्याच्या वायरची चोरी; आरोपी अटक  महाळुंगे एमआयडीसीमध्ये कंपनीतून तांब्याच्या वायरची चोरी; आरोपी अटक Reviewed by ANN news network on ५/२८/२०२५ ०५:०१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".