परशुराम जयंतीनिमित्त चैत्रगौर हळदीकुंकू समारंभ उत्साहात

 


पिंपरी चिंचवड : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शाखा व पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने परशुराम जयंतीनिमित्त चैत्रगौर हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात व पारंपरिक थाटात पार पडला. या कार्यक्रमाला सुमारे ४०० महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची सुरुवात जम्मू-काश्मीरमधील पेहेलगाम येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. त्यानंतर परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. विष्णुसहस्त्रनाम व परशुराम स्तोत्राचे सामूहिक पठण करण्यात आले.

या कार्यक्रमात शृंगेरी मठ येथे जाऊन भगवद्गीता कंठस्थ करून संपूर्ण गीतेचे पठण करणाऱ्या प्रियाताई जोग यांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. त्यांना प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल उपस्थितांकडून अभिनंदन करण्यात आले.

स्वच्छंदी मंगळागौर ग्रुपच्या महिलांनी मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. संपूर्ण कार्यक्रम वातावरणात उत्साह, आनंद आणि एकोप्याची भावना दिसून आली. पारंपरिक चैत्रगौर सजावट व सुंदर आरास यामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

महिलांना हळदीकुंकू, डाळकैरीचे पन्हे, हरबऱ्याची ओटी देण्यात आली. या कार्यक्रमाच्या आयोजनात व यशस्वीतेसाठी सुषमा वैद्य, वैशाली कुलकर्णी, कविता बारसावडे, संध्या कुलकर्णी, आरती कोशे, संगीता कुलकर्णी, संपदा गुपचूप, मनाली राजवाडे, सुनिधी, मधुवंती वखरे, साक्षी जोशी, धनश्री देशमुख, नेहा साठे, पूर्वा बारसावडे, ऋजुता कुलकर्णी आदींनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमास दिलीप कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या. शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी, महेश बारसावडे, मकरंद कुलकर्णी, शामकांत कुलकर्णी, भाऊ कुलकर्णी, अभय कुलकर्णी, राहुल कुलकर्णी, आनंद देशमुख, संजय परळीकर, भूषण जोशी हे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने करण्यात आला. सूत्रसंचालन मधुवंती वखरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संध्या कुलकर्णी यांनी केले.

..............................................

#ParshuramJayanti
#HaldiKumkumCelebration
#ChaitraGauri2025
#PimpriChinchwadEvents
#WomenEmpowerment
#TraditionalFestivals
#PNJewellers
#BrahminMahasangh
#CulturalCelebration
#BhagavadGitaPathan


परशुराम जयंतीनिमित्त चैत्रगौर हळदीकुंकू समारंभ उत्साहात परशुराम जयंतीनिमित्त चैत्रगौर हळदीकुंकू समारंभ उत्साहात Reviewed by ANN news network on ५/०२/२०२५ ०५:५१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".