पुणे, दि. २८: वाकड पोलिसांनी ताथवडे परिसरात कारवाई करत ३ हजार ५०० रुपये किंमतीची देशी दारू आणि ८० हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त केली आहे. याप्रकरणी रामु नरसप्पा कोडेल (वय ५५) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मे २०२५ रोजी सायंकाळी ४.४५ वाजता अशोकनगर चौक, ताथवडे येथे पोलीस हवालदार तुषार शेटे यांना आरोपी रामु कोडेल हा बेकायदेशीरपणे देशी दारूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला थांबवून तपासणी केली असता, त्याच्याजवळ पॉवर लार्म पंच या कंपनीच्या देशी दारूच्या बाटल्या आणि एमएच-१४-केई-३७७८ क्रमांकाची जुपिटर दुचाकी आढळून आली.
पोलिसांनी दारू आणि दुचाकी जप्त केली आहे. आरोपी रामु कोडेल याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अतुल जाधव पुढील तपास करत आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------
#WakadCrime #IllegalLiquor #Seizure #PunePolice #ProhibitionAct
Reviewed by ANN news network
on
५/२८/२०२५ ०५:२४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: