कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या अभियानात वैयक्तिक प्रश्न, नागरी समस्या, सोसायट्यांचे विषय, अपेक्षित विकासकामे आणि विविध प्रलंबित विषयांसंदर्भात नागरिकांनी भेटी घेतल्या. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
"एक लोकप्रतिनिधी म्हणून थेट सामान्य नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न मार्गी लावल्यानंतर नागरिकांचा येणारा प्रतिसादही निश्चितच तितकाच आनंददायक आहे," असे मत केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, "महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकार आपल्या समस्यांचे नक्की निराकरण करेल या विश्वासातूनच मोठ्या प्रमाणावर नागरिक अशा अभियानात सहभागी होत आहेत आणि त्यांच्या अडचणींचे निराकरण करून घेत आहेत."
या अभियानात विविध शासकीय योजनांचे तसेच कागदपत्रे-दाखल्यांसंदर्भातील स्टॉल उभारण्यात आले होते. महसूल, पोलीस प्रशासन, महापालिका, महावितरण यांसह शासनाच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाला भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्यासह शहर पदाधिकारी, कोथरूड विधानसभा मतदारसंघातील तिन्ही मंडलांचे पदाधिकारी, नगरसेवक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभियानात कोथरूड भागातील सुमारे १५०० नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. ज्या समस्या तातडीने सोडवणे शक्य होते, त्या लगेचच सोडवल्या गेल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्या. इतर प्रश्न आणि समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी सर्व संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
.............................................
#KhasdarJanSamparkSeva
#MuralidharMohol
#ChandrakantDadaPatil
#Kothrud
#Pune
#DoubleEngineGovernment
#BJP
#PublicService
#CitizenService
#MaharashtraGovernment

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: