"स्मारक भव्य-दिव्य होण्यासाठी पुरातत्त्व व बांधकाम विभागाने अन्य मोठ्या प्रकल्पांचा अभ्यास करावा आणि अधिक भव्यता कशी आणता येईल हे पहावे," अशी सूचना श्री. पवार यांनी केली. मंदिराच्या पाहणीनंतर झालेल्या बैठकीत प्रथम पहलगाम, काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
"आपल्याला सर्वांना सोबत घेऊन हा प्रकल्प पुढे न्यायचा आहे. स्थानिकांच्या भावना जराही दुखावणार नाहीत याची काळजी घेऊन त्यांच्या सहमतीने स्मारक उभे करायचे आहे. ज्यांची जागा जाईल, त्यांना योग्य मोबदला देऊ," असे श्री. पवार यांनी स्पष्ट केले.
बैठकीत पुरातत्त्व विभागाच्या स्थापत्य अभियंता इंद्रजीत नागेश्वर यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. "कर्णेश्वर हे प्राचीन मंदिर आहे. त्याच्या पावित्र्याचे जतन केले पाहिजे. स्मारकाच्या पाच एकर क्षेत्रातील नदीकाठावरील मंदिरांचेही संवर्धन केले जाणार आहे," असे उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले, "येत्या ३० जून रोजी सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात स्मारक व परिसर विकास प्रकल्पाच्या निधीला मंजुरी घेऊ. राष्ट्रीय पातळीचे स्मारक करताना हेरिटेज टच देऊन येथील हवामानाला अनुकूल असे टिकाऊ स्मारक बनवू."
या बैठकीला पालकमंत्री डॉ. उदय सामंत, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार प्रमोद जठार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव आणि रोहन बने, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
...................................
#ChhatrapatiSambhajiMaharaj
#AjitPawar
#NationalMonument
#Ratnagiri #Sangeshwar
#MaharashtraHeritage
#HistoricalHeritage
#KarneshwarMandir
#DevelopmentProject
#MarathaHeritage

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: