उरण : कॅन्सरच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिपीशा कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्युट उलवे तर्फे अनुवंशिक कॅन्सरविषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये कॅन्सर होण्याचे कारण, त्यावर उपाययोजना, कॅन्सर होऊ नये यासाठी आवश्यक काळजी, तसेच अनुवंशिक कॅन्सर आणि फॅमिली सिंड्रोम यावर तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
दिल्ली येथील कॅन्सर तज्ञ डॉ. अनुपमा घोष, डॉक्टर पाटील, डॉक्टर शितल बिपाशा आणि दिपीशा कॅन्सर सेंटरच्या अध्यक्ष दिपाली गोडघाटे यांनी उपस्थितांना कॅन्सर विषयक महत्त्वाचे मार्गदर्शन दिले. यावेळी साई संस्थांचे अध्यक्ष रवीशेठ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य पार्वती पाटील, शिरीष कडू, हरीश मोकल यांसह मोठ्या संख्येने रुग्ण आणि नातेवाईक उपस्थित होते. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
..................................
#DipishaCancerCenter
#GeneticCancer
#CancerAwareness
#Ulve
#CancerGuidelines
#CancerCamp

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: