उरण : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६ पेक्षा जास्त निष्पाप पर्यटकांचा बळी गेला. या अमानवी हल्ल्याचा सकल हिंदू समाज उरण तर्फे उरण शहरातील गणपती चौकात तीव्र निषेध करण्यात आला.
हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी "पाकिस्तान मुर्दाबाद", "आतंकवादांचा खात्मा करा" अशी घोषणाही देण्यात आली. सकल हिंदू समाज उरणचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
............................
#SakalHinduSamajUran
#TerroristAttackProhibition
#Shraddhanjali
#Uran
#PakistanMurdabad
#EndTerrorism
सकल हिंदू समाज उरणतर्फे भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध
Reviewed by ANN news network
on
४/२७/२०२५ ०९:५०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: