चिंचवड (प्रतिनिधी): चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचार मोहिमेला जोरदार गती मिळाली आहे. काळेवाडी-रहाटणी परिसरात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय या मित्रपक्षांचे कार्यकर्ते 'हम सब शंकरभाऊ' या नाऱ्यासह प्रचारकार्यात सक्रिय झाले आहेत.
मतदारसंघातील सर्व प्रभागांमध्ये शंकर जगताप यांनी गाठीभेटी आणि बैठकांचा धडाका लावला असून, त्यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महायुतीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत असून, येत्या २० नोव्हेंबरच्या मतदानात जगताप यांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.
प्रचार मोहिमेत माजी नगरसेविका ज्योती भारती, प्रमोद ताम्हणकर, ललिता पाटील, नीता पाडाळे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य काळूराम नढे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले आहेत. कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, मागील वर्षभरापासून विकासकामांच्या माध्यमातून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत आहेत.
विशेष म्हणजे प्रभागातील चारही नगरसेवक महायुतीचे असल्याने, शंकर जगताप यांना काळेवाडीतून विक्रमी मताधिक्य मिळण्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. प्रत्येक कार्यकर्ता स्वतःला उमेदवार समजून काम करत असल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: