पुणे : दिवाळी सणाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत पुणे आर्टिस्ट ग्रुप आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने भोर तालुक्यातील दुर्गम भागात मिठाई, ब्लँकेट, पुस्तकं आणि भेटवस्तूंचं वाटप करण्यात आलं. धानवली, दुर्गाडी (मानटवस्ती), उबार्डे (उबार्डेवाडी) आणि आशिंपी या गावांतील नागरिकांना हा मदतीचा हात देण्यात आला. चित्रकार सुरेंद्र कुडपणे-पाटील यांच्या पुढाकाराने आणि सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमात सुरेंद्र कुडपणे-पाटील यांच्यासह सिकंदर रणवरे, सचिन पडवळ, महेश तेनकाळे, नितीन थोरात, योगेश गुजर, सौरभ वावळ, स्वामी धुमाळ, मयूर शिळीमकर, वनाजी साटोटे, विलास मतगुडे, जय कुडपणे, करण कुडपणे आणि इतर अनेक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. तसेच वैभव मिठारे, सुजित काळे, अबीर मिठारे, प्रभास काळे, विजय धनावडे, धनश्री काळे, रणधीर खवले, अजय दळवी, श्री. टिके, गंगादास मच्छा, कुणाल बेलदरे, सुनीता राव, देवयानी नलावडे, स्वप्नील कुयटे, सनी कुडपणे, अनिकेत देशमुख, स्वाती जराडे, पौर्णिमा वाळुंज, पूर्णिमा गोरडे, स्नेहा नवरे, आकाश कुडपणे, नितीन फडणीस, योगेश गायकवाड, अस्मिता देशपांडे, रामदास कांबळे, संजय गरुड, रीना शहा, रवी गायकवाड, महेंद्र थोपटे, धनंजय कोटकर, शोभा रायकर यांनी देखील सहभाग घेतला.
या सामाजिक उपक्रमाचं हे सहावं वर्ष आहे. दरवर्षी पुणे आर्टिस्ट ग्रुपकडून वेगवेगळ्या गावांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम आयोजित केले जातात. यावर्षी भोर तालुक्यातील दुर्गम परिसरात पायाभूत सुविधांची कमतरता असूनही निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या नागरिकांना दिवाळीचं आनंदमय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
"या उपक्रमातून स्थानिक नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य उमलावं, यासाठी आम्ही निरपेक्ष भावनेने या कार्यात सहभागी झालो. त्यांचं आनंदी जीवन पाहून आम्हाला समाधान मिळतं," असे सुरेंद्र कुडपणे-पाटील, वैभव मिठारे आणि सुजित काळे यांनी सांगितलं.
 Reviewed by ANN news network
        on 
        
११/०१/२०२४ ०५:०४:०० PM
 
        Rating:
 
        Reviewed by ANN news network
        on 
        
११/०१/२०२४ ०५:०४:०० PM
 
        Rating: 

 
 
 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: