भाजपचे १४७ जागांवर उमेदवार जाहीर
मुंबई : भारतीय जनता पक्षाने (भाजप) सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. या यादीत चार महिला उमेदवारांचा समावेश असून, सहा सध्याच्या आमदारांना डावलण्यात आले आहे.
मूर्तिजापूर, वर्सोवा, घाटकोपर पूर्व आणि माळशिरस या मतदारसंघांत सध्याच्या आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र करंजा, आर्वी, नागपूर मध्य, अर्णी, उमरखेड आणि बोरिवली येथील आमदारांना उमेदवारी नाकारण्यात आली.
२०१९ च्या निवडणुकीत पराभूत झालेल्या चरणसिंग बाबुलाईजी ठाकूर (काटोल) आणि डॉ. मिलिंद पांडुरंग माने (नागपूर उत्तर-अनुसूचित जाती) यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दीर्घकालीन खाजगी सचिव सुमित वानखेडे यांना आर्वी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. २०१९ मध्ये फडणवीसांचे माजी पीए अभिमन्यू पवार यांनाही औसा मतदारसंघातून यशस्वी उमेदवारी दिली होती.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी डॉ. संतुक मारोतराव हंबर्डे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. काँग्रेसचे खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.
आतापर्यंत भाजपने एकूण १४७ उमेदवारांची घोषणा केली असून, २० नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीही तयारी तीव्र करत आहे.

भाजपने लोकसभा उमेदवार खुप उशिरा दिला.
उत्तर द्याहटवा