धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात असलेल्या सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरला आपल्या सहकार्याकडून ३ हजार रुपयांची लाच घेताना धाराशिव येथील अॅन्टीकरप्शन खात्याच्या पथकाने २५ जुलै रोजी अटक केली.
डॉ. नितीन कालिदास गुंड, वय 32 वर्षे, वैदयकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव, ता तुळजापूर जि. धाराशिव रा. अरुणचंद्र बारच्या पाठीमागे, तुळजाईनगर, तुळजापूर जि. धाराशिव असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे.त्याच्यावर तामलवाडी पोलीसठाण्यात १०२/२०२४ क्रमांकाने, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मसला खुर्द येथे कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून काम करणार्या एका व्यक्तीने अॅन्टीकरप्शनकडे तक्रार केली होती. तक्रारदाराचा त्यांची पगार, वैदयकीय रजा, किरकोळ रजा व इतर अतिरीक्त कामाचा मोबदला देण्याचे अधिकार आरोपी डॉ. नितीन गुंड यांच्या हाती आहेत. तक्रारदाराची दोन दिवसांची किरकोळ रजा मंजूर करण्यासाठी आणि त्याचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांना न पाठविण्यासाठी डॉ. गुंड यांनी तक्रारदाराकडे ३ हजार रुपये लाच मागितली.
या प्रकरणी त्यक्रारदाराने अॅन्टीकरप्शनकडे तक्रार दिली. त्यांनी सापळा लावून आरोपी डॉ. नितीन गुंड यांना ३ हजार रुपयांची लाच घेताना पकडले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधिक्षक मुकुंद आघाव, पोलीस उप अधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे, यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, विकास राठोड, अंमलदार इफ्तेकार शेख,मधुकर जाधव, विशाल डोके यांनी केली

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: