दिलीप शिंदे
सोयगाव : पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री ना. अब्दुल सत्तार यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल सोयगाव येथे त्यांचे जनसंपर्क कार्यालय सेना भवन येथे शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. एकमेकांना लाडू- पेढा भरवून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करीत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशे, छत्रपती शिवाजी महाराज, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे ,मंत्री अब्दुल सत्तार यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
याप्रसंगी संतोष बोडके, अक्षय काळे, गजानन कुडके, कदीर शहा, राजू दुतोंडे, शेख रौफ भगवान जोहरे, हर्षल काळे, किशोर मापारी, अशोक खेडकर, लतीफ शहा, मोतीराम पंडित, दिलीप देसाई, गजानन ढगे, भगवान वारंगणे, किशोर सोनवणे, विक्रम चौधरी, मुकुंद तळले, देवेंद्र तेलंग्रे, अरुण वाघ, खंडू पाटील, सोपान देवरे, नासिर शेख, आयुब पठाण, राहुल मंडवे, वसीम पटेल, मुस्ताक शहा, सुरज चव्हाण, आवेश शहा, जावेद शहा आदींची उपस्थिती होती.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा पालकमंत्री पदी अब्दुल सत्तार, कार्यकर्त्यांचा जल्लोष....
Reviewed by ANN news network
on
७/२६/२०२४ ०१:२१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: