तीन टोळ्यांचा समावेश
पिंपरी: पिंपरी चिंचवड परिसरातील तीन गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हिंजवडीतील पगार टोळी, भोसरीतील दळवी टोळी आणि पिंपरीतील काळे टोळी यांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे शहरातील नागरिकांना त्रास होत असल्यामुळे पोलिसांनी ही कठोर पावले उचलली आहेत.
मोका लावण्यात आलेल्या टोळ्या:
1. हिंजवडीतील पगार टोळी: प्रमुख योगेश गोकूळ पगार (वय 31, रा. नाशिक), दिपक भगवान जाधव (वय 26, रा. चाकण, पुणे), योगेश शिवाजी दाभाडे या टोळीच्या विरुद्ध एकूण दहा गुन्हे नोंदवले आहेत.
2. भोसरीतील दळवी टोळी: प्रमुख ओमकार मल्हारी दळवी (वय 22, रा. दिघी, पुणे) व इतर सहकाऱ्यांवर एकूण सात गुन्हे दाखल आहेत. या टोळीने भोसरी आणि परिसरात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी यांसारख्या गुन्हे केले आहेत.
3. पिंपरीतील काळे टोळी: प्रमुख सुप्रिम राजु काळे (वय 24, रा. शंकरनगर, चिंचवड, पुणे) व इतर सदस्यांवर सात गुन्हे दाखल आहेत. या टोळीनेही हिंसक आणि गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.
या टोळ्यांनी विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या माध्यमातून शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, बेकायदेशीर हत्यारे ठेवणे, आदींचा समावेश आहे. या टोळ्यांच्या विरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याने शहरात थोडा सुरक्षिततेचा वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक कन्हेया थोरात, नितीन फटांगरे, अशोक कडलक,निरीक्षक अनिल देवडे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: