यशश्री शिंदे हत्या प्रकरणी स्वयंस्फूर्तीने नागरिकांचा निषेध मोर्चा; पोलीसठाण्याला घेराव!

 


विठ्ठल ममताबादे

उरण : यशश्री शिंदे हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद आज २८ जुलै रोजी उरणमध्ये उमटले. शहरातील सर्व सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि नागरिक यांनी स्वयंस्फूर्तीने मोर्चा काढून उरण पोलीसठाण्याला घेराव घातला. आणि, या प्रकाराचा निषेध करत पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ संशयित आरोपीला अटक करावी अशी एकमुखी मागणी केली.

जनतेच्या या उद्रेकानंतर उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठनिरीक्षक राजेंद्र कोते (पाटील )यांनी जनतेला शांततेतेचे आवाहन केले. आरोपीचा शोध सुरु असून कोणत्याही अफ़वांवर विश्वास ठेवू नका. कोणीही कायदा हातात घेऊ नका. यशश्री शिंदे हिला न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन मोर्चेकरांना दिले.

हा मोर्चा उरण शहरातील गांधीपुतळा ते राजपालनाका, चारफाटा, चारफाटा ते परत राजपालनाका मार्गे उरण पोलीसस्टेशन अशा मार्गाने काढण्यात आला.मोर्चात पुरुष, युवा यांच्यासोबत महिलांचाही सहभाग लक्षणीय होता.

यशश्रीच्या हत्येचा निषेध म्हणून उरणमधील सर्व व्यापारांनी आपली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.

यशश्री शिंदे हिची हत्या ही लव्हजिहादचा प्रकार असल्याची चर्चा उरण परिसरात सुरू आहे. या प्रकरणात एका अल्पसंख्य तरुणाचे नाव संशयित म्हणून पुढे आले असून तो गायब झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पोलीस तपासात ढिलाई करत असल्याचा आरोप जनतेकडून होत आहे. आरोपीला त्वरित अटक न झाल्यास उरणमधील परिस्थिती अधिक बिघडण्याची शक्यता आहे.

उरण शहरात एन. आय. हायस्कूलच्या जवळ राहणारी यशश्री सुरेंद्र शिंदे वय २२ ही गुरुवार दिनांक २५ जुलै रोजी सकाळी घरातून निघाली ती दुपारी दिडच्या सुमारास उरण बाजारपेठ येथे आढळून आली. मात्र त्या नंतर ती  कुठेही दिसली नाही. मुलगी घरी न आल्याने तीच्या नातेवाईकांनी तीचा शोध घेतला. मात्र ती कुठेही आढळून आली नाही. त्यानंतर मुलगी हरवली किंवा बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तीच्या कुटुंबियांनी ती हरविली असल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात नोंदविली.तीचा शोध सुरु होता मात्र ती कुठेही सापडली नाही. 

दिनांक २६ जुलै रोजी रात्री उरण तालुक्यातील कोटनाका येथील पेट्रोलपंपानजिक तिचा मृतदेह आढळला. शवविच्छेदन झाल्यानंतर तिच्या शरीरावर अनेक वार करून तिची क्रूरतेने हत्या केल्याची बाब समोर आली. या प्रकरणात दाऊद शेख या व्यक्तीचे नाव संशयित म्हणून पुढे आले आहे. त्याला पकडण्यात पोलीस दिरंगाई करत असल्याचा आरोप जनतेकडून होत आहे.

दरम्यान, आरोपीला त्वरित पकडले नाही तर उरण मध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा मोर्चातील संतप्त नागरिकांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.विद्यमान आमदार महेश बालदी,शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत,राष्ट्रवादीच्या भावना घाणेकर,कामगार नेते संतोष घरत, गणेश नलावडे, भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ, शेतकरी कामगार पक्षाच्या उरण तालुका अध्यक्षा सीमा घरत, काँग्रेस पक्षाच्या उरण तालुका अध्यक्षा रेखा घरत, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, लोकजनशक्ती पक्षाचे संतोष पवार, भाजपचे रवी भोईर, नगरसेवक कौशिक शहा, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबळे, मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उरण तालुका उपाध्यक्ष शिवाजी ठाकूर,महिला जनवादी संघटनेचे हेमलता पाटील, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पाटील, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, विविध हिंदुत्ववादी संघटनेचे प्रतिनिधी, विविध महिला संघटनांचे पदाधिकारी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते (पाटील )यांची भेट घेऊन तात्काळ कारवाईची मागणी केली.

यशश्री शिंदे हत्या प्रकरणी स्वयंस्फूर्तीने नागरिकांचा निषेध मोर्चा; पोलीसठाण्याला घेराव! यशश्री शिंदे हत्या प्रकरणी स्वयंस्फूर्तीने नागरिकांचा निषेध मोर्चा; पोलीसठाण्याला घेराव! Reviewed by ANN news network on ७/२८/२०२४ ०७:५३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".