पूरस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका
पुणे : पुणे शहरात पूरस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांना निलंबित केले आहे.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. भुयारी मार्गात पाणी साठल्याने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला होता. नागरिकांनी याला जबाबदार धरत महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठविली होती. या प्रकरणी पालकमंत्री अजित पवार यांच्यासह शहरातील नेत्यांनी पालिका आयुक्तांना कानपिचक्या दिल्यानंतर भानावर आलेल्या महापालिका आयुक्तांनी खलाटे यांना निलंबित केले आहे.
पुणे महापालिकेचे सहायक आयुक्त संदीप खलाटे निलंबित
Reviewed by ANN news network
on
७/२८/२०२४ ०४:००:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: