नगर : एका गुन्ह्यतील आरोपीला अटक न करण्यासाठी दीडलाख रुपयांची लाच मागणार्या अहमदनगर शहर पोलीसदलाच्या दहशतवाद विरोधी पथकातील एका पोलीसनाईकाला अॅन्टीकरप्शन खात्याच्या पथकाने २२ जुलै रोजी पकडले.
संदीप चव्हाण असे या पोलीस नाईकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात भिंगार पोलीसठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी तक्रार दिलेल्या व्यक्तीच्या मालकीच्या हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या पार्किंगमध्ये त्याच्या भावाने गोळीबार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणामध्ये तक्रारदाराच्या भावाला अटक न करता सोडून देण्यासाठी आरोपी संदीप चव्हाण याने २ लाख रुपये लाच मागितली. तकारदाराने या बाबत अॅन्टीकरप्शनकडे तक्रार दिली.
अॅन्टीकरप्शनच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली त्यावेळी आरोपीने वाटाघाटी अंती २ ऐवजी दीड लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
अॅन्टीकरप्शनच्या पथकाने या प्रकरणी संदीप चव्हाणवर भिंगार पोलीसठाण्यात गुन्हा दाखल केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: