पुणे : मध्य रेल्वेने पुणे-मिरज-पुणे दरम्यान १२ अतिरिक्त अनारक्षित डेमू आषाढी स्पेशल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. गाड्यांचा खालीलप्रमाणे तपशील पुढीलप्रमाणे आहे.
पुणे-मिरज-पुणे स्पेशल (१२ सेवा)
01147 अनारक्षित डेमू आषाढी स्पेशल:
दिनांक: 15.07.2024 ते 20.07.2024 (6 ट्रिप)
वेळ: पुण्याहून सकाळी 08.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 16.15 वाजता मिरजला पोहोचेल.
01148 अनारक्षित डेमू आषाढी स्पेशल:
दिनांक: 15.07.2024 ते 20.07.2024 (6 ट्रिप)
वेळ: मिरज येथून सायंकाळी 16.45 वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री 23.55 वाजता पुण्याला पोहोचेल.
थांबे: हडपसर, दौंड, जेऊर, कुर्डुवाडी, मोडलिंब, पंढरपूर, सांगोला, म्हसाबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठे महांकाळ, सालग्रे, आरग
रचना:
- 10 कार डेमू
प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: