रत्नागिरी : रत्नागिरी येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयात काम करणार्या मुख्य लिपिकाला ११ जुलै रोजी ५० हजार रुपयांची लाच घेताना अॅन्टीकरप्शन खात्याच्या अधिकार्यांनी पकडले.
विनायक रामचंद्र भोवड, (वय ५७ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य लिपिकाचे नाव आहे. एका व्यक्तीने या प्रकरणी अॅन्टीकरप्शन खात्याच्या रत्नागिरी कार्यालयाकडे तक्रार दिली होती.
या व्यक्तीच्या सावकारी परवान्याचे काम करून देण्यासाठी आरोपी भोवड यांनी स्वतःसाठी आणि डीडीआर कार्यालयाला देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली. अॅन्टीकरप्शनच्या अधिकार्यांनी २६ जून रोजी याची खातरजमा केली. त्यावेळी तक्रारीत तत्थ्य असल्याचे आढळल्याने ११ जुलै रोजी अॅन्टीकरप्शन खात्याच्या पथकाने सापळा रचून दुपारी ११ वाजून ५६ मिनिटांनी भोवड यांना ५० हजार रुपयांची लाच घेताना 'रंगेहाथ' पकडले. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी अॅन्टीकरप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे,अपर अधीक्षक महेश तरडे, गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी येथील अॅन्टीकरप्शन ब्युरोच्या कार्यालयाने केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: