शेवा कोळीवाडा पुनःर्वसनाबाबत प्रकल्पग्रस्तानां भूखंड देण्याचे खा. बारणेचे आश्वासन
विठ्ठल ममताबादे
उरण : १३ मे रोजी मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपा - शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनतीने घराघरांतील मतदारांपर्यंत पोहोचून मला मोठ्या मताधिक्याने मला तिसऱ्यांदा विजय संपादन करून दिला.हा विजय आपण मागील १० वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आणि जनसामान्यांनी दाखविलेला विश्वास आहे.
हा जनतेचा हा विश्वास द्विगुणित करण्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपला हा विजयरथ असाच पुढे जाणार असल्याचा दृढ निर्धार मावळचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांनी उरण तालुक्यातील जसखार येथे बोलताना व्यक्त केला.
उरण तालुक्यातील जसखार येथील रत्नेश्वरी देवी मंदिराच्या सभागृहात उरण तालुका शिवसेनेच्या वतीने खा.श्रीरंग बारणे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी खा. श्रीरंग बारणे यांनी हा निर्धार व्यक्त केला. मावळ लोकसभा मतदार संघात केलेल्या भरघोस विकास कामांमुळे विरोधकांना प्रचाराचा मुद्दा नसल्याने पर्यायाने मावळ मतदार संघातील जनतेने विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आणि मला तिसऱ्यांदा निवडून दिल्याने मी जनतेचा सदैव ऋणी राहीन असे भावनिक प्रतिपादन खा.बारणे यांनी केले.
उरण,पनवेल तसेच कर्जत विधानसभा मतदार संघातील भाजपा कर्यकर्यांनी शिवसैनिकां बरोबर जोमाने काम केल्यामुळेच आपली विजयी पताका कायमच राहिली असून आपल्या मतदानातही वाढ झाली असल्याचे खा.श्रीरंग बारणे यांनी स्पष्ट करून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पनवेलचे आ. प्रशांत ठाकूर,उरणचे आ. महेश बालदी व कर्जत - खालापूरचे आ. महेंद्र थोरवे यांना पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा, असे आवाहन खासदार बारणे यांनी कार्यकर्त्यांना केले.
मावळ लोकसभा मतदार संघात हॅटट्रिक करणाऱ्या श्रीरंग बारणे यांच्या या सत्कार समारंभात
जेएनपीएचे विस्थापित शेवा कोळीवाडा यांच्या पुनःर्व सनाबाबत केंद्रीय बंदर मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरु असून, प्रकल्पग्रसतांना लवकरच जेएनपीए भूखंड मिळणार असल्याचे आश्वासन नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले.या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांमध्ये उपजिल्हाप्रमुख अतुल भगत,माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, उपजिल्हाप्रमुख वैजयंती ठाकूर, विधानसभा महिला संघटक मेघा दमडे, विधानसभा संपर्कप्रमुख रमेश म्हात्रे, तालुकाप्रमुख महेंद्र पाटील,दिपक ठाकूर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर, भाजपच्या महिला उपाध्यक्ष संगीता पाटील आणि इतर अनेक मान्यवरांसह जनसमुदाय उपस्थित होता.
मावळ मतदार संघातील विजयरथ असाच पुढे नेऊ या - खा.श्रीरंग बारणे
Reviewed by ANN news network
on
६/२०/२०२४ १०:४४:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: