चिपळूण : चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथे पूर आणि प्रदूषण या विषयावर नदी की पाठशाला दिनांक 21 जून ते 23 जून 2024. कोकणातील नद्या दुष्काळप्रवण आहेत मुळातच सुमारे 800 ते 1000 मीटर उंचीवरून उगम पावणाऱ्या नद्या 60 ते 100 किलोमीटर चा प्रवास करून समुद्राला मिळतात.
पर्जन्य
तसेच कोकणामध्ये पर्जन्यमानही 1000 मिलिमीटर पासून 8000 मिलिमीटर पर्यंत असे विस्तृत आणि भरपूर असते. कोकणात सातत्याने डोंगराळ भागामध्ये काही ना काही नैसर्गिक आणि मानवी हालचाली चालूच असतात. उदा. नोंद न करता येण्याजोगे होत असलेले भूकंप, रस्ते, रेल्वे मार्ग ,भुयारी मार्ग, गॅसच्या पाईपलाईन इत्यादीसाठी डोंगराची तोड आणि त्यातून वाटा काढणे हे गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे. या व इतरांनी कारणांमुळे डोंगरावर असलेला माती मिश्रित गाळ यामध्ये छोटे-मोठे दगड गोटे मोठ्या प्रमाणावर वाहून नद्यांमध्ये येतात आणि त्यामुळे नद्यांची वहन क्षमता कमी होते. परिणामी पुराची तीव्रता वाढते. नदीचे पाणी नागरी वस्तीमध्ये शिरणे ,आणि त्यामुळे नुकसान होणे हे गेल्या एक दशकामध्ये आपण स्पष्टपणे पाहिले आहे. 2005 चा मुंबईचा महापूर असो अथवा 2021 चा चिपळूणचा महापूर असो; दोन्ही मुळे होणारे आर्थिक आणि जीवित हानी ही न सोसवणारी आहे. प्रशासनावर देखील त्याचा प्रचंड ताण येत असतो. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यवसाय आणि कारखानदारी उभारली असल्यामुळे त्यांना लागणाऱ्या पाण्याचा स्त्रोत हा नद्या आणि धरणे हेच आहेत. या पाण्याच्या वापरानंतर ते प्रदूषित पाणी पुन्हा जलस्त्रोतांत सोडण्यात येते असाही अभ्यास आहे. परिणामी नद्यांच्या पाण्याच्या प्रदूषणाची समस्या अतिशय तीव्र झाली आहे. पूर आणि प्रदूषण यामुळे मानवी जीवनावर आणि अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होते आहे हे सर्वमान्य आहे.
नदी की पाठशाला
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने चला जाणूया नदीला हे अभियान राज्यभर सुरू आहे. या अंतर्गत नदी की पाठशाला यांच्या माध्यमातून नागरिक, ग्रामस्थ ,विद्यार्थी ,महिला यांच्यापर्यंत पोहोचणे सुलभ व्हावे यासाठी नदीची माहिती नदीला जाणून घेणे नदी जाणल्यानंतर काय करावे? याची चर्चा करणे यासाठी, नगरपरिषद चिपळूण, जिल्हा प्रशासन चिपळूण ,आणि चला जाणूया नदीला या अभियाना अंतर्गत डी बी जे महाविद्यालय चिपळूण येथे दिनांक 21 ते 23 जून या कालावधीमध्ये नदी की पाठशाला आयोजित केलेली आहे .
या पाठशालेमध्ये कोण प्रवेश घेऊ शकतो?
ज्यांना नदी आणि पर्यावरणाबद्दल प्रेम आहे आणि त्या समस्यांना तोंड देण्यासाठी योगदान देण्याची मानसिकता आहे असा कोणीही नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतो.
गूगल फॉर्म भरावा
सहभागी होण्यासाठी सोबतच्या गुगल फॉर्ममध्ये आपली वैयक्तिक माहिती भरून तो फॉर्म सबमिट करावा. त्यानंतर निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींची नावे अंतिम करण्यात येतील .त्यांना दिनांक 20 जून 2024 रोजी सायंकाळी अथवा 21 जून 2024 रोजी सकाळी 9 वाजता डी बी जे महाविद्यालय चिपळूण येथे उपस्थित रहावे लागेल. नदीच्या पाठशाला यासाठी कोकणातील विशेषता रत्नागिरी ,सिंधुदुर्ग ,ठाणे,पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी युवक युवती त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असेल.
नंतर काय?
नदी की पाठशाला संपल्यानंतर त्यांना आपापल्या क्षेत्रामध्ये, उन्नत भारत आणि उन्नत महाराष्ट्र अभियानांतर्गत काही अभ्यास प्रकल्प घेता येतील. ज्याचा उपयोग त्यांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक उपलब्धतेमध्ये निश्चित होऊ शकेल. जागा मर्यादित आहेत त्यामुळे तत्काळ गुगल फॉर्म भरून सबमिट करावे. नदी की पाठशाला मध्ये मार्गदर्शन करण्यासाठी डॉ राजेंद्रसिंह त्याचप्रमाणे राज्यातील या विषयातील विषय तज्ञ आणि प्रत्यक्ष काम करणारे आणि अभ्यासक येथे येणार आहेत .
अधिक संपर्कासाठी स्थानिक नियोजन प्रमुख श्री शहानवाज शहा नदी प्रहरी वाशिष्ठी नदी यांच्याशी संपर्क करावा.
+91 98228 20395
(visit:nadikipathshala.org)
Google form link

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: