दिलीप शिंदे
सोयगाव :सोयगाव जवळील माळेगाव(पिंपरी) शिवारात रस्त्यालगत अवैध वृक्षतोड केलेल्या लाकडांचा ट्रक भरण्यात येत असल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी एक वाजता उघडकीस आल्या नंतर तातडीने संबंधित खासगी व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची तक्रार भाजपचे शहराध्यक्ष योगेश पाटील यांनी सोयगाव तहसील कार्यालयात केली आहे.
सोयगाव, जरंडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून डेरेदार वृक्षांची अवैध कत्तल सुरू आहे याकडे सोयगाव वनविभागाने कानाडोळा केला असल्याचा आरोप सतत होत असतांनाही अद्यापही सोयगाव वनविभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही गुरुवारी दुपारी एक वाजता अवैध कटाई केलेल्या विविध डेरेदार वृक्षांची लाकडे भरलेली ट्रक भर रस्त्यात भरल्या जात होती हा प्रकार लक्षात येताच योगेश पाटील यांनी सोयगाव तहसील कार्यालयात लेखी तक्रार दिली आहे दरम्यान सोयगाव, जरंडी या भागात गेल्या तीन महिन्यापासून सर्रासपणे अवैध वृक्षतोड सुरू आहे खासगी व्यापारी मात्र झाडे विकत घेऊन या झाडांची कत्तल करतात व पाचोरा बोदवड आदी ठिकाणी या झाडांची लाकडे सौ मिल मध्ये विकतात हा प्रकार सर्रासपणे सुरू असताना मात्र वनविभागाने तीन महिन्यांत बघ्याची भूमिका घेत एकही मोठी कारवाई केलेली नाही या प्रकाराला वनविभाग जबाबदार असल्याचे योगेश पाटील यांनी आरोप केला आहे यापूर्वीही उपवनसंरक्षक(सहाय्यक) आशा चव्हाण यांच्याकडे त्यांनी तक्रार केली होती..
माळेगाव पिंपरी रस्त्यावर अवैध लाकडांनी भरलेला ट्रक असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी वनविभागाचे पथक पाठविण्यात आले होते परंतु त्या वाहनात सर्वच शासनाने दिलेल्या वाहतूक परवाना तून सूट दिलेल्या वृक्षांची लाकडे होती त्यामुळे कारवाई करता आली नसल्याचे वनविभागाने सांगितले तर भाजप चे शहराध्यक्ष योगेश पाटील यांनी वनविभाग वर आरोप करत आर्थिक व्यवहारातून हा सर्रास प्रकार सुरू असल्याचे सांगितले आहे...
माळेगाव(पिंपरी) शिवारात सर्रासपणे वृक्षतोड-वनविभागाचे दुर्लक्ष...
Reviewed by ANN news network
on
६/१४/२०२४ ०३:१७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: