पुणे : मतदारांच्या प्रभावी आणि संघटीत जनआंदोलनातून आगामी विधानसभा निवडणूकीत सत्तापरिवर्तन करण्याच्या हेतूने भारत जोडो अभियानच्या वतीने मतदार नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, १६ जुन २०२४ रोजी ,दुपारी अडीच वाजता साने गुरुजी स्मारक, दांडेकर पुलाजवळ, पुणे येथे ही कार्यशाळा होणार आहे.संदीप बर्वे(सचिव, पुणे जिल्हा,भारत जोडो अभियान),इब्राहीम खान(समन्वयक, पुणे लोकसभा मतदारसंघ,भारत जोडो अभियान),एकनाथ पाठक (सहसचिव, पुणे जिल्हा भारत जोडो अभियान) यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
विनामूल्य नावनोंदणीसाठी 9860387827,9822066050,9881244959 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रविवारी मतदार नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळा
Reviewed by ANN news network
on
६/१३/२०२४ ०५:२३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: