छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा हरित वारसा असलेल्या सिल्लोडच्या चिंचवन येथील चारशे वर्षं पुरातन, तीन एकरवर विस्तारीत वडाची शासन दरबारी अवहेलना
दिलीप शिंदे
सोयगाव : सिल्लोड-तालुक्यातील चिंचवन वडाचे येथे ६ पिढ्यांची साक्ष देणारा ४०० वर्षे वयाचा मूळ १० एकर जमिनीवर एकच झाड असलेला व आता मानवी अतिक्रमण, झाडाची नैसर्गिक पतझड, भौतिक विकास आदी कारणामुळे हा पुरातन हरित वारसा आज अखेरची घटिका मोजत आहे.या झाडाचे संशोधक अभ्यासक अभिनव प्रतिष्ठान चे डॉ.संतोष पाटील यांनी या गावाचा पंचायत ठराव घेऊन , सर्वेक्षण अहवाल बनवून पूर्ण प्रस्ताव राज्य सरकारच्या वारसा वृक्ष समितीचे तत्कालीन अध्यक्ष रंगनाथ नाइकवडे यांचे कडे सहा वर्षात चार वेळा व जिल्हा वारसा समितीचे अध्यक्ष असलेले जिल्हाधिकारी यांना ही पाठविला आहे मात्र, वेळोवेळी पाठपुरावा करून ही सरकार दरबारी काही ही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही.
गतवर्षी सामाजिक वनीकरण विभागाचे डी एफ ओ यांचे सहित संबंधित अधिकारी याचे सर्वेक्षण करून गेले पण कागद पुढे सरकला नाही. सदर ऐतिहासिक वृक्ष महसूल विभागाच्या गट क्र १०७ व १०८ या वर नोंद असून मूळ १० एकर असलेला या वडाची ७ एकर जमीन चोरीस गेली आहे. मानवी अतिक्रमण हे याचे कारण.सदर जमीन मोजणी करून परत शासनाने ताब्यात घेऊन तेथे वडाची झाडे लावावीत म्हणून त्यांनी तहसीलदार यांचे कडे अर्ज केला होता पण यासही प्रतिसाद मिळाला नाही.
अन्नसाखळी व जैवविविधतेचा हॉट स्पॉट
या झाडास डॉ संतोष पाटील यांनी अनेकदा भेट दिली असून तेथे १२ प्रजातींचे फुलपाखरे,२५ प्रकारचे कीटक,२८ प्रजातींचे पक्षी,त्या झाडाखाली १० हुन अधिक महत्वाच्या वनस्पती ज्यात वारकरी संप्रदायात महत्वाची असलेली वाघाटी वनस्पती वेल यांचा अधिवास असल्याची नोंद केली आहे.
सिल्लोड तालुक्याचा ऑक्सिजन प्लॅन्ट
५ ते २० वर्षे वयाचे झाड तासाला ५०० लिटर ऑक्सिजन वातावरणात उत्सर्जित करते. चिंचवन चा हा वड रोज पाच हजार लिटर ऑक्सिजन वातावरनात सोडतो.हे झाड रोज दोन टन पाणी बाष्प स्वरूपात सोडते त्यामुळे उन्हाळ्यात या झाडाखाली बाह्य तापमानाहुन ५ ते ६ डिग्री सेल्सियास तापमान कमी असते.
अशी ही "वट"
या झाडाची जमिनीपासून उंची ४० ते ४५ फूट ,झाडाचा घेर १८ ते २० फूट, १४०० पारंब्या,४० फूट लांब फांद्या, २ हजार माणसे झाडाखाली बसतील इतकी मोठी व्याप्ती. हेरिटेज ट्री(वारसा वृक्ष ) दर्जा मिळाला तर च टिकेल ऐतिहासिक ठेवा.
राज्य सरकारचे धोरण आहे की १०० वर्षे हुन अधिक वयाच्या झाडांना वारसा वृक्ष घोषित करून त्यांचे जतन व्हावे.येथील मानवी हस्तक्षेप व अतिक्रमण काढून जमीन मोजून ती परत वडाकडे सुपूर्द व्हावी व तेथे परत वडाची झाडे लावून वारसा वृद्धिंगत व्हावा.- डॉ.संतोष पाटील, पर्यावरण संवर्धक,सिल्लोड-सोयगाव .
सत्यवानाला वाचवण्याऱ्या वडाला सरकारी ऑक्सिजनची गरज
Reviewed by ANN news network
on
६/२०/२०२४ ०९:०८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: