सरकार गतिमान,अधिकारी बेभान, अधिकारी तक्रारीची दखल घेत नसल्याने ग्रामपंचायत सदस्या असलेल्या आदिवासी महिलेवर आमरण उपोषणाची वेळ...



दिलीप शिंदे 

सोयगाव :  ग्रामपंचायत सदस्या असलेल्या आदिवासी महिलेचा सन्मान न राखणाऱ्या सोयगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दादाराव आहेर व  संबंधित कर्मचाऱ्यांवर  सेवाहमी कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात यावी व दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करून आठ दिवसात कारवाई न झाल्यास तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्या श्रीमती सकूबाई कैलास इंगळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर व तहसीलदार तथा तालुकादंडाधिकारी सोयगाव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. गतिमान असलेले सरकार व राजकिय दबावामुळे बेभान झालेले अधिकारी यांच्या नाकारते पणामुळे ग्राम पंचायत सदस्या असलेल्या आदिवासी महिलेवर आमरण उपोषण करण्याची वेळ येत असल्याने  तालुक्यात खळबळ उडाली आहे.
 
          याबाबत सविस्तर माहिती अशी, तालुक्यातील गलवाडा (अ) ग्रामपंचायतच्या महिला ग्रा.प. सदस्या श्रीमती सकूबाई इंगळे यांनी गलवाडा (अ) ग्रामपंचायत ने  १५ वा वित्त आयोग अंतर्गत केलेल्या कामाची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी दि.०२ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.छत्रपती  संभाजीनगर यांच्याकडे लेखी तक्रार पोस्ट रजिस्ट्री द्वारे दिली होती.त्याची दखल घेत डॉ.ओ. आर. रामावत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी दि.२०/०२/२०२४ रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती सोयगाव यांना चौकशी करण्यास आदेशीत केले होते. मात्र गटविकास अधिकारी दादाराव आहेर यांनी दोन महिन्यानंतर  दि.२२/०४/२०२४ रोजी विस्तार अधिकारी (पंचायत) याना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले. परंतु चार महिन्याचा कालावधी लोटला राजकीय दबावामुळे अद्यापही चौकशी करून कार्यवाही झाली नाही. माझी तब्बेत बरोबर नसल्याने व गलवाडा(अ) गावापासून सोयगाव दोन किमी असल्याने मी सतत पंचायत समिती कार्यालयात जाऊ शकत नाही त्यामुळे मी माझा मुलगा राहुल कैलास इंगळे यास गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क करून मी दिलेल्या तक्रारीची चौकशी बाबत विचारणा करण्यास सांगितले. गटविकास अधिकारी दादाराव आहेर यांच्याशी संपर्क साधला त्यांनी तब्बल दोन महिन्यानंतर एस. एच. राकडे विस्तार अधिकारी (पंचायत)  दि.२०/०२/२०२४ रोजी चौकशी करण्यासंबंधी लेखी आदेश दिले. परंतु अद्यापही चौकशी करण्यात आली नाही.मी एक महिला ग्रामपंचायत सदस्या असून अधिकारी मी महिला असल्याने माझा स्वाभिमान,सन्मान  ठेवत नाही. व माझ्या तक्रारींचे निराकरण करीत नाही. मी केलेल्या तक्रारी बाबत चौकशी करण्यास टाळाटाळ करण्याऱ्या गटविकास अधिकारी दादाराव आहेर व विस्तार अधिकारी (पं) यांच्यावर सेवाहमी कायद्याअंतर्गत कारवाई करावी व मी केलेल्या तक्रारी संदर्भात आठ दिवसात न्याय न दिल्यास मी दि.२४/०६/२०२४ वार सोमवारी तहसिल कार्यालय सोयगाव येथे आमरण उपोषण करेल.यात माझे काही बरेवाईट झाल्यास यास शासन व प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. महायुतीच्या काळात व गरिबांचे कैवारी म्हणून घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात महिलांचा सन्मान राखला जातो का हा चर्चेचा विषय सोयगाव तालुक्यात रंगला आहे.महिला ग्रामपंचायत सदस्या आदिवासी असल्याने त्यांना  आमरण उपोषण करावे लागत असल्याने सर्व सामन्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
सरकार गतिमान,अधिकारी बेभान, अधिकारी तक्रारीची दखल घेत नसल्याने ग्रामपंचायत सदस्या असलेल्या आदिवासी महिलेवर आमरण उपोषणाची वेळ...  सरकार गतिमान,अधिकारी बेभान, अधिकारी तक्रारीची दखल घेत नसल्याने ग्रामपंचायत सदस्या असलेल्या आदिवासी महिलेवर आमरण उपोषणाची वेळ... Reviewed by ANN news network on ६/१८/२०२४ ११:५५:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".