भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम
पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत 'मुसाफिर-एक अनवट शोध'हा दृकश्राव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.भारतीय राग संगीत शिकण्याच्या ओढीने भारतात आलेल्या आणि येत असलेल्या परदेशी कलाकारांच्या मुलाखतींवर हा कार्यक्रम आधारित आहे.संशोधन आणि संहिता वंदना अत्रे यांची असून त्यांच्यासमवेत डॉ.चंद्रकांत संकलेचा हे अभिवाचन करणार आहेत.
हा कार्यक्रम शनिवार,दि.२२ जून २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे.रसिकांना तो विनामूल्य खुला आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २१४ वा कार्यक्रम आहे,अशी माहिती भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
Reviewed by ANN news network
on
६/१८/२०२४ ११:५२:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: