सोयगावला ४६ हजार ८५२ पाठ्यपुस्तकांचा पुरवठा, शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार १३ हजार ५७४ विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके..
सोयगाव : जिल्हा परिषदेच्या मोफत पाठ्यपुस्तक योजना -२०२४-२५ अंतर्गत सोयगावला इयत्ता पहिली ते आठवीच्या तेरा हजार ५७४ विद्यार्थ्यांसाठी बुधवारी सोयगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी विभागाला ४६ हजार ८५२ पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे त्यामुळे शैक्षणिक सत्राच्या पहिल्या च दिवशी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं मिळणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी रंगनाथ आढव यांनी सांगितले आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषदेच्या सोयगाव तालुक्यातील १२० प्राथमिक शाळा सेमी इंग्रजी होणार आहे त्यामुळे सेमीच्या विद्यार्थ्यांना चार हजार तिनशे साठ पुस्तके प्राप्त झाली आहे तर मराठी माध्यमाची ३९ हजार ५४७ पुस्तके प्राप्त झाली आहे उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना ही २ हजार ९४५ पुस्तके सोयगाव ला प्राप्त झाली आहे दरम्यान ही मोफत पाठ्य पुस्तक योजना पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे सोयगाव तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १२० प्राथमिक शाळा आहे पहिल्या वर्गासाठी शाळा सुरू होण्यापूर्वी च पहिलीच्या वर्गात १५०५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे शाळापूर्व प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यामुळे पहिली च्या १५०५ विद्यार्थ्यांसह उर्वरित इयत्तेच्या तेरा हजार ५७४ विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके मिळणार असून गटशिक्षणाधिकारी कार्यालयात प्राप्त पुस्तकं येत्या तीन दिवसात केंद्रास्तरावर पुरवठा करण्यात येणार आहे याकामी गटशिक्षणाधिकारी रंगनाथ आढाव,परमेश्वर कठोरे, सुनील बावचे, सचिन पाटील आदी पुढाकार घेत आहे..
सोयगावला ४६ हजार ८५२ पाठ्यपुस्तकांचा पुरवठा, शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार १३ हजार ५७४ विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके..
Reviewed by ANN news network
on
५/२३/२०२४ ०९:२१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: