मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी पुणे विभागाची केली पाहणी

 


पुणे : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री राम करण यादव यांनी २३ मे रोजी पुणे विभागाची पाहणी केली.  सुरुवातीला त्यांनी पुणे यार्ड रीमॉडेलिंग आणि इलेक्ट्रॉनिक इंटर कार्य या बाबत इन्स्पेक्शन कॅरेजमध्ये चर्चा केली.  त्यानंतर त्यांनी पुणे यार्ड आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग ठिकाणांची पाहणी केली.

घोरपडी कोचिंग मेंटेनन्स कॉम्प्लेक्स येथे असलेल्या द्रोणाचार्य कोच मध्ये महाव्यवस्थापकांना वंदे भारत मेंटेनन्स, आळंदी एनएमजी मेंटेनन्स स्कीम, सिमेन्स इलेक्ट्रिकल शेड/घोरपडी स्कीम बद्दल सादरीकरण देण्यात आले. श्री राम करण यादव यांनी घोरपडी कोचिंग मेंटेनन्स कॉम्प्लेक्स च्या तपासणी सोबत आयओएच शेड, बूट लॉन्ड्री लिनेन ची देखील पाहणी केली.

विभागीय कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये चाकण ते उरुळी मार्गे रांजणगाव या प्रस्तावित नवीन मार्गिकेच्या कामांबाबत उपमुख्य इंजीनियर (निर्माण) - पुणे यांच्याकडून महाव्यवस्थापकांना सादरीकरण करण्यात आले.
महाव्यवस्थापकांनी उरुळी येथील प्रस्तावित मेगा कोचिंग टर्मिनलबाबत देखील चर्चा केली.

 श्री राम करण यादव यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय (सर्व बीओ चेंबर्स आणि कार्यालये) तसेच नियंत्रण कक्षाची पाहणी केली. या वेळी सर्व विभागांच्या रेल्वे सपोर्ट युनिट्सना पूर्णपणे तयार राहण्यास सांगण्यात आले होते.

महाप्रबंधक यांनी हडपसर येथील गतिशक्ती कामाची पाहणी करण्याबरोबरच लोणी स्थानकात सुरू असलेल्या कामांबाबतही चर्चा केली.

 मुख्य प्रशासनिक अधिकारी ( निर्माण) श्री ए. के. पांडे , विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इंदू राणी दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री बृजेश कुमार सिंह, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (GSU) श्री. प्रकाश उपाध्याय आणि मुख्यालय तसेच पुणे विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी देखील या पाहणीवेळी उपस्थित होते.

 
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी पुणे विभागाची केली पाहणी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी पुणे विभागाची केली पाहणी Reviewed by ANN news network on ५/२३/२०२४ ०९:१८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".