अंतर्मनाचा ठाव घेत काळजातून आलेली कविता देते जगण्याची प्रेरणा : भारत सासणे

 


डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ : फ. मु. शिंदे यांच्या 'त्रिकालकाव्यसंग्रहाच्या प्रकाशनावेळी डावीकडून अमृता तांदळेप्रा. मिलिंद जोशीरामदास फुटाणेफ. मु. शिंदेडॉ. पी. डी. पाटीलभारत सासणेडॉ. रमेश वरखेडे व डॉ. राजशेखर शिंदे.


डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठपिंपरीपुणे व न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसतर्फे 'त्रिकालकाव्यसंग्रहाचे प्रकाशन

 

पिंपरी  : "मानवाच्या अंतरमनात डोकावण्याची ताकत कवीच्या लेखनात असते. अंतर्मनाचा ठाव घेत काळजातून आलेली कविता आपल्याला जगण्याची प्रेरणा देते. फ. मु. शिंदे यांच्या कवितांमध्ये विश्व कारुण्य दिसते. वाट पाहण्याचीसहनशीलतेची क्षमता असणाऱ्या फ. मु. यांच्या 'त्रिकालकाव्यसंग्रहात माणसाच्या जीवनाचे अप्रतिम दर्शन घडते. रसिकांना घडवण्याचेसमृद्ध करण्याचे काम यातून होत आहे. त्रिकाल सत्य सांगणाऱ्या या कविता आहेत," असे प्रतिपादन ज्येष्ठ कथा-कादंबरीकार व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांनी केले.

 

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठपिंपरीपुणे व न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस आयोजित प्रसिद्ध कवीलेखक फ. मु. शिंदे यांच्या 'त्रिकालया काव्यसंग्रहाचे प्रकाशन पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कवी फ. मु. शिंदेलीलाताई शिंदेविडंबनकारपटकथा लेखक-दिग्दर्शक रामदास फुटाणेमहाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशीलेखक-समीक्षक डॉ. रमेश वरखेडेलेखक-समीक्षक प्रा. डॉ. राजशेखर शिंदे उपस्थित होते. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठपिंपरीपुणे आणि न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजिला होता. सभागृहात साहित्यिक राजन लाखेमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवारवि. दा. पिंगळेकवयित्री डॉ. संगीता बर्वेज्येष्ठ पत्रकार अरुण खोरेसंवाद पुणेचे सुनील महाजनमाधव राजगुरूसतीश पिंपळगावकर यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, "फ. मु. शिंदे यांनी मराठी साहित्य क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांच्या 'आईया कवितेने महाराष्ट्रातील प्रत्येक रसिकाला भारावून टाकले आहे. साहित्य संमेलनसाहित्यिकांच्या सहवासातून साहित्य क्षेत्रात योगदान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. चांगल्या साहित्यकृतीला प्रोत्साहन देऊन त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे भाग्य आम्हाला लाभत आहे. गंभीर विचारांची प्रतिभा असलेलासामान्य माणूसशेतकरीकष्टकरी यांना जोडणारासमाजभान असलेला हा कवी आहे. त्यांच्या विचार व भावविश्वाची ओळख रसिकांना होते. सामाजिक भाष्य करणाऱ्याविद्रोहाची मांडणी असलेल्या या कविता आहे. वैचारिक व चिंतनशील स्वरूपाच्या या रचना समाजाला प्रबोधनपर असूनरसिकांना अंतर्मुख करायला लावतात. रसिकांशी संवाद करणारी त्यांची कविता आहे."

 

फ. मु. यांनी आपल्या मिश्किल शैलीत कार्यक्रमाचे निरीक्षण नोंदवले. ते म्हणाले, "साहित्यिकाला दाद कशी द्यावीयाचे मूर्तिमंत उदाहरण पी. डी. पाटील सर आहेत. असा सोहळा होणे ही कवीच्या आयुष्यात लक्षणीय गोष्ट असते. कवीने समाजाचे भावविश्व शब्दांत गुंफावे. आजवरच्या जगण्यात अनुभवलेले भवतालसमाजातील विविध घटनाप्रसंग टिपण्याचा प्रयत्न 'त्रिकालकाव्यसंग्रहातून केला आहे. तुमचे सांगायचे राहून गेलेले असतेते कवी मांडतो. रसिक आणि कवी यांच्यातील अनुबंधाचा भाग कविता असते." यावेळी त्यांनी सादर केलेल्या 'आई', 'मनासारखे जगण्यास आता मन होत नाही', 'खोटे चालते पुढेपाय मोडला खऱ्याचाव 'पी. डी. पाटीलया कवितांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

 

रामदास फुटाणे म्हणाले, "औद्योगिक नगरीला साहित्यनगरी करण्याचे काम पी. डी. सरांकडून होत आहे. फ. मु. यांच्या ओठांत खट्याळपणातर हृदयात संवेदनशीलपणा आहे. राजकारण इतके विचित्र आहे की साहित्यिकांनी बोलावे की नाहीअशी स्थिती आहे. वात्रटिकांचे उद्गाते पाडगावकर आणि फ. मु. आहेत. कवीसाहित्यिकांनी निडरपणे आपल्या भूमिका मांडायला हव्यात."

 

प्रा. डॉ . राजशेखर शिंदे म्हणाले, "एकूण २५४ तुकड्यांत मांडलेले 'त्रिकालहे कवीचेसमाजाचे चरित्र आहे. दंशडंखविखारी अनुभव कविमनाला प्रश्न करतात. उत्तरांचा शोध घेत अभिजात प्रवृत्तीचे दर्शन घडविण्याचे काम कवी 'त्रिकाल'मध्ये करत आहे. मिश्किल स्वभावाचे असलेले फ. मु. कवी म्हणून तितकेच संवेदनशीलसामाजिक भानकारुण्यभाव असलेले व्यक्तिमत्व आहे."

 

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, "छंदाचेलयीचे अनेक प्रयोग करणारे कवी आज कमी झाले आहेत. डोळ्यांत अंजन घालणाऱ्या काव्याची निर्मिती व्हायला हवी. फ. मु. आणि रामदास फुटाणे यांनी मराठी कविता सर्वदूर पोहोचवण्यात मोठे योगदान दिले आहे. राजकारण्यांचासमाजाचा तोल ढळतोतेव्हा सावरण्याचे काम कवी करत असतो. वैभवशाली मराठी साहित्याचे दर्शन घडवण्याचे काम पी. डी. पाटील सातत्याने करीत आहेत."

 

डॉ रमेश वरखेडे म्हणाले, "त्रिकालची गुणात्मक व्याप्ती ही तुकोबांच्या गाथा इतकी विशाल आहे. भावविश्वाचा सर्वांगाने घेतलेला आढावा या काव्यसंग्रहात दिसतो. अनुभव छटांची रांगोळी जणू यामध्ये दिसते." ज्यांनी आई ही कविता रचलीत्यांच्या वाणीतून टी रचना ऐकणे हा मणिकांचन योग असल्याची भावना रसिकांनी व्यक्त केली.

 

प्रकाशिका अमृता तांदळे यांनी प्रास्ताविक केले. गायिका प्रांजली बर्वे यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवाततर पसायदानाने सांगता झाली. प्रा. प्रतिमा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

अंतर्मनाचा ठाव घेत काळजातून आलेली कविता देते जगण्याची प्रेरणा : भारत सासणे अंतर्मनाचा ठाव घेत काळजातून आलेली कविता देते जगण्याची प्रेरणा : भारत सासणे Reviewed by ANN news network on ५/१७/२०२४ १०:१६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".