विठ्ठल ममताबादे
उरण : उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका यांना आर्वाच्च भाषेत अश्लील हातवारे करून शिवीगाळ करणाऱ्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी उरण पंचायत समितीच्या कार्यालया समोर येथील ग्रामसेवक आणि ग्रामसेविकांनी जोरदार घोषणाबाजी करीत दोषीवर काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला.
तालुक्यातील हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सौ सुप्रिया घरत या उरण पंचायत समिती येथे विस्तार अधिकारी विनोद मिंडे यांच्या दालनात माहितीच्या अधिकार कायाद्या अंतर्गत सुनावणीसाठी कर्तव्यावर हजर असतांना रविंद्र कोळी यांचे अर्जाबाबत विस्तार अधिकारी विनोद मिंडे यांच्याशी चर्चा करीत असतांना रविंद्र कोळी यांनी ग्रामसेविका सुप्रिया घरत यांना अश्लील हातवारे करीत आर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.याबाबत उरण पोलिस ठाण्यात घरत यांनी रविंद्र अनंत कोळी यांचे विरोधात १५ मे २०२४ रोजी तक्रार दाखल केली आहे.
मात्र सदर तक्रारीची उरण पोलिसांनी तात्काळ दाखल घेऊन महिला वर्गास न्याय देणेसाठी सदर कृत्य करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई अशी मागणी उरण तालुक्यातील ग्रामसेवकांनी केली असून दुपारी ३:०० उरण पंचायत समितीचे कार्यालया समोर काळ्या फिती लावून तिव्र शब्दात निषेध करून संबंधितावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
ग्रामसेविकेस शिवीगाळ करणाऱ्यावर कारवाईसाठी काळ्या फिती लावून निषेध
Reviewed by ANN news network
on
५/१७/२०२४ १०:२०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: