पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई
पुणे : आंतरराष्ट्रीय पातळीवर पाळेमुळे पसरलेल्या महादेव बेटिंग अॅप प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने नारायणगाव येथे छापा घालून तेथील एका बड्या व्यापार्यासह त्याच्या कुटुंबातील दोन व्यक्ती अशा एकूण ७० जणांना एका तीन मजली इमारतीतून अटक केली. महादेव बेटिंग अॅपचे काम या इमारतीत सुरू होते.
छत्तिसगड मधील भिलाई येथील सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी महादेव बेटिंग ॲप सुरु केले. यातून त्यांना दररोज शेकडो कोटी रुपयांची कमाई होऊ लागली. ग्रामीण भगातील गरीब व्यक्तींची बँक खाती त्यांना अल्प मोबदला देऊन ताब्यात घेत त्याद्वारे उलाढाल केली जात असल्याने हा प्रकार उघडकीस येणे कठीण होते. पोलिसांना याची कुणकुण लागल्याचे लक्षात येताच सौरभ चंद्राकर याने दुबई येथे स्थलांतरित होऊन तेथून आपला कारभार पाहण्यास सुरुवात केली.
गतवर्षी त्याच्या लग्नसोहळ्यावर त्याने उधळलेल्या रकमेमुळे तो भारतीय तपासयंत्रणांच्या रडारवर आला. त्यानंतर सरकारने या अॅपवर बंदी घातली. तथापि त्याने नेमलेले एजंट जागोजागी असल्यामुळे अप्रत्यक्षरित्या हा व्यवसाय सुरूच होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: