'पुणे आयडॉल २०२४' गायन स्पर्धा २७ मे ला सुरू होणार



पुणे : सोमेश्वर फाउंडेशन आयोजित महाराष्ट्रातील हौशी गायक कलाकरांसाठी दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या 'पुणे आयडॉल २०२४' स्पर्धेचे २७ मे ते २ जून रोजी सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी होणार असल्याचे आज जाहीर केले.

स्व. आमदार विनायक निम्हण यांनी सन २००२ साली सुरू केलेल्या या स्पर्धेचे यंदा २३ वे वर्ष आहे. प्रसिद्ध गायक अरूण दाते, प्रभा अत्रे, रविंद्र साठे, महेश काळे, त्यागराज खाडिलकर, डॉ. सलील कुलकणी, शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे, वैशाली सामंत, अभिजित सावंत, अभिजित कोसंबी अशा गायक क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी या स्पर्धेच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना मार्गदर्शन केले आहे. सौरभ साळुंके, कोमल कृष्ण, तुषार रिठे, प्रमोद डाडर, विनोद सुर्वे, महंमद रफी अशा अनेक प्रतिभावंत कलाकारांनी गायन क्षेत्रात आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.

स्पर्धेचे परिक्षक म्हणून श्रीपाद सोलापूरकर, मेधा चांदवडकर, मंजुश्री ओक, राजेश दातार, दिपक कुलकर्णी आदी सहभागी होणार असल्याचे गायक जितेंद्र भूरूक यांनी सांगितले. वय वर्षे १५ पर्यंत 'लिटिल चॅम्प्स', '१५ ते ३० वर्ष युवा आवाज', 'वय वर्ष ३० ते ५० जनरल हवा हवाही' 'वय वर्ष ५० नंतर ओल्ड इज गोल्ड' अशा चार गटात होणार आहेत. सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या हौशी कलाकारांना विशेष निमंत्रित करून त्यांना गाण्याची संधी व सोमेश्वर फाउंडेशन तर्फे सन्मानित केले जाणार आहे

प्रत्येक गटातील विजेत्यास रोख रक्कम रूपये, १५ हजार, १० हजार व ५ हजार व मानाचे पुणे आयडॉल सन्मान चिन्ह दिले जाणार आहे. काही उत्तेजनार्थ गायक निवडून लाखो रूपयांचे रोख बक्षीस दिली जाणार आहेत. स्पर्धेचे उ‌द्घाटन प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी ( ज्यांनी आपल्या कलेचा अविष्कार आपल्या गायिकीने ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून सुरू केला आहे ) यांच्या हस्ते सकाळी ९.३० वा. पंडित भीमसेन जोशी सभागृह, औंध येथे होणार आहे. अंतीम फेरी २ जून रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे होणार असल्याचे सांगितले. स्पर्धेचे फॉर्म www.sunnynimhan.com येथे तसेच सोमेश्वर फाउंडेशन, मो. ८३०८१२३५५५ शिवाजीनगर, गावठाण, जे.एम. रोड, पुणे येथील कार्यालयात उपलब्ध आहेत. प्रवेशाची अंतीम तारीख २५ मे २०२४ राहिल. स्पर्धेसाठी अमित मुरकूटे, अनिकेत कपोते, गणेश शेलार, सचिन मानवतकर, प्रमोद कांबळे आदी नियोजन करत आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क: जितेंद्र भुरूक: ९८२२४४००५२ | उमेश वाघ ९३७२४६००६०

'पुणे आयडॉल २०२४' गायन स्पर्धा २७ मे ला सुरू होणार  'पुणे आयडॉल २०२४' गायन स्पर्धा २७ मे ला सुरू होणार Reviewed by ANN news network on ५/१६/२०२४ १२:२२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".