पुणे : कल्याणीनगर 'हिट अॅन्ड रन' केसमधील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना आज २२ मे रोजी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले.
पोलिसांनी या प्रकरणात ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. मात्र, न्यायालयाने २४ मे पर्यंत विशाल अग्रवाल यांना पोलीस कोठडी दिली आहे.
सरकारी वकिलांनी कोठडीची मागणी करताना विशाल अग्रवाल यांनी नोंदणी झाली नसलेली गाडी अल्पवयीन मुलाला चालविण्यास का दिली. तो अल्पवयीन आहे हे माहीत असताना त्याला पबमध्ये का जाऊ दिले. मुलाला पॉकेटमनी कशासाठी खर्च करण्यास दिला जातो. विशाल अग्रवाल फरार का झाले होते. त्यांना अट्क करण्यात आली तेव्हा त्यांच्याकडे एक साधा मोबाईल सापडला. बाकीचे मोबाईल कुठे आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी पोलिसांना तपास करावयाचा आहे असे म्हणणे मांडले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: