बाल न्यायमंडळाने दिला आदेश
पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात विनानोंदणीची पोर्श कार बेभानपणे चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बड्या बिल्डरच्या मुलाचा जामीन रद्द करून त्याला रिमांडहोममध्ये पाठविण्याचा आदेश बाल न्यायमंडळाने दिला आहे.
समाजाच्या सर्वच स्तरातून टीका होऊ लागल्याने पुणे पोलिसांनी बाल न्यायमंडळासमोर पुनर्विचारासाठी नव्याने काही कलमांचा समावेश करत अर्ज दाखल केला. त्यानंतर मंडळाने त्याचा जामीन रद्द करत त्याला रिमांडहोममध्ये पाठविण्याचा आदेश दिला.
पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम १८५ त्याच्यावर गुन्हा दाखल केला. २२ मे रोजी त्याला न्यायमंडळासमोर हजर करण्यात आले यावेळी न्यायमंडळाने हा आदेश दिला. दरम्यान प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी माध्यमांशी बोलताना य प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करणे चुकीचे आहे असे मत प्रदर्शित केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: