नवीन शेवा उरण येथे सुमारे १०० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान

 




विठ्ठल ममताबादे

उरण : रक्तदान शिबिरांची श्रृंखला कायम ठेवत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवार दि. २१ एप्रिल २०२४ रोजी नवीन शेवा , उरण येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिरात सुमारे १०० निरंकारी भक्तांनी मानवीयतेच्या भावनेतून मोठ्या उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. संत निरंकारी रक्तपेढी, विले पार्ले मार्फत रक्त संकलन करण्यात आले.

निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य शिकवणूकीमुळे निरंकारी भक्तगणांमध्ये मानव सेवेची भावना दृढमूल झालेली असून ते रक्तदाना व्यतिरिक्त इतर अनेक सामाजिक सेवांमध्ये निरंतर आपले योगदान देत आहेत. या शिबिरात देखील सुमारे १५० भक्तांनी रक्तदानासाठी आपली नावे नोंदवली होती यावरुन सद्गुरु माताजींच्या शिकवणूकीचा प्रभाव दिसून येतो.

संत निरंकारी मंडळाचे क्षेत्रीय संचालक  अशोक केरेकर यांच्या शुभहस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक दत्ताराम पाटील तसेच सेक्टर मधील सर्व ब्राँच चे मुखी, सेवादल, संचालक व अधिकारी उपस्थित होते. 

नवी मुंबई उरण विभागातून  मनोहर गजानन भोईर (शिवसेना, जिल्हा प्रमुख - रायगड) तसेच सोनल निलेश घरत (सरपंच, नवीन शेवा) आदि मान्यवर व्यक्तींनी या शिबिराला सदिच्छा भेट दिली.

संत निरंकारी मंडळाचे उरण सिटी ब्राँचचे मुखी समीर सहदेव पाटील यांनी स्थानिक सेवादल युनिट व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक यांच्या सहकार्याने या शिबिराचे यशस्वी आयोजन केले गेले.
नवीन शेवा उरण येथे सुमारे १०० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान नवीन शेवा उरण येथे सुमारे १०० निरंकारी भक्तांचे उत्स्फूर्त रक्तदान Reviewed by ANN news network on ४/२२/२०२४ ०३:५२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".