अनिरुध्दाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट उरणतर्फे रक्तदान

 


विठ्ठल ममताबादे

उरण  : अनिरुद्धाज अँकडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट उरण अंतर्गत सदगुरु श्री अनिरुद्ध समर्पण पथक उरण तालुका सहयोगाने रविवार दि २१ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९ सायंकाळी ४:३० या वेळेत उरण नगरपरिषद शाळा क्र.१, पेंशनर पार्क समोर, उरण शहर येथे भव्यदिव्य असे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 

राज्यात दरवर्षी होणारा रक्ताचा तुटवडा व रक्ता अभावी होणारे मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेता दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. दरवर्षी प्रमाणेही उरणमध्ये यावर्षीही रक्तदान शिबीराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. एकूण २०१ रक्तदाते रक्तदान करायला आले त्यामधून १५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

सदर रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी सद्‌गुरु श्री अनिरुध्द समर्पण पथक उरण तालुका केंद्रांच्या सर्व श्रद्धावान यांनी विशेष मेहनत घेतली. या रक्तदानामुळे रक्ता अभावी होणारे मृत्यूचे प्रमाण कमी होणार आहे.  आपतकालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होणार आहे. या रक्तदानामुळे अनेकांचे यामूळे जीव वाचणार आहेत. त्यामूळे अनिरुद्धाज अकॅडमी मॉक डिझास्टर मॅनेजमेंट,सद्‌गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र उरण तालुका सर्व उपासना केंद्राने आयोजित केलेला रक्तदान शिबीराचा कार्यक्रम सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी व आदर्श ठरला आहे.
अनिरुध्दाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट उरणतर्फे रक्तदान अनिरुध्दाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट उरणतर्फे रक्तदान Reviewed by ANN news network on ४/२२/२०२४ ०३:४८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".